खासदार हेमंत गोडसे, न केलेल्या कामाचे श्रेय घेवू नका

खासदार हेमंत गोडसे यांच्यावर आमदार फरांदेंची टिका
Devyani Pharande & Hemant Godse
Devyani Pharande & Hemant GodseSarkarnama

नाशिक : आमदार प्रा. देवयानी फरांदे (Devyani Pharande)यांनी खासदार गोडसे (MP Hemant Godse) यांना न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा लोकांची कामे करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार गोडेस व भाजपच्या फरांदे यांच्यात वाद रंगण्याची शक्यता आहे.

Devyani Pharande & Hemant Godse
नवा व्हेरियंट येतोय... राजकीय मंडळी अलर्ट होतील का?

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चळवळीचे मुख्य केंद्र राहिलेल्या अभिनव भारत मंदीराच्या नुतनीकरण कामाचे उद्‌घाटन झाल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी मंदिरासाठी निधी आणल्याचा दावा केला होता. त्यावरून भाजप व शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे.

Devyani Pharande & Hemant Godse
मंजुळा गावितांनी मतदारसंघासाठी आणला ६१.७४ कोटींचा निधी!

यासंदर्भात आमदार फरांदे म्हणाल्या, नाशिकच्या अभिनव भारत मंदिरचे नुतनीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. हा विषय देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या काळात एक कोटी रुपयांचा निधी देवून मार्गी लागला. पुनर्विकासाचे कार्यारंभ आदेश देऊन काम प्रगतिपथावर आहे. त्यानंतर अभिनव भारत मंदिरला अतिरिक्त पाच कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने अठरा मे २०१८ला माझ्या पत्रावर निधी मंजुर केला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही मागणी केली होती. दुसरीकडे खासदार गोडसे यांनी याबाबत कोणतीही प्रक्रिया न करता अभिनव भारत मंदिर ट्रस्टला भेट देखील दिली नाही. तरीही झालेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयातून नव्याने प्रस्ताव देखील देण्यात आला नाही. कोणतेही काम न करता याबाबतचे श्रेय लाटण्याचा दुर्दैवी व केविलवाणा प्रयत्न खासदार गोडसेंनी केला असल्याचेही त्यांनी नमुद केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com