Nashik News : गेले काही दिवस रोप-वे व्हावा यासाठी खासदार गोडसे सातत्याने प्रयत्नशील आहेत. या भागात रोप-वेची गरज नाही. नागरिकांचा त्याला प्रचंड विरोध आहे. रोप-वे झाल्यास या भागातील व विशेषतः त्र्यंबकेश्वरच्या वनसंपदेचेे नुकसान होणार आहे. (Collector took a closed door meeting for Rop-way issue in Nashik)
जिल्हाधिकारी (Nashik) कार्यालयात शुक्रवारी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या उपस्थितीत अंजनेरी रोप-वे बाबत बैठक झाली. यावेळी पर्यावरणप्रेमींनी त्याला प्रचंड विरोध केला.
अंजनेरी येथील प्रस्तावित रोप- वेमुळे परिसरातील दुर्मिळ वृक्ष, निसर्गसंपदा, पशू- पक्षांच्या अधिवासावर होणाऱ्या परिणामाचा त्रयस्थ समितीमार्फत अभ्यास करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसह पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची मदत घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.
अंजनेरी ते ब्रह्मगिरी प्रस्तावित रोप-वेमुळे निसर्गसंपदा व पशु-पक्ष्यांच्या अधिवासाला धक्का पोहचणार आहे, त्यामुळे प्रस्तावित प्रकल्प रद्द करण्यासाठी पर्यावरणप्रेमींकडून आजच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली. त्यासाठी यापूर्वी विविध माध्यमातून आंदोलनेही झाली. यापार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमींची मते जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोप-वेच्या ऊभारणीसाठी दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १२ व १५ गुंठ्यांची जागा लागणार आहे. मात्र, रोप-वेमुळे अंजनेरी भागातील दुर्मिळ वनस्पतींमुळे हा भाग ‘इको-सेन्सेटीव्ह’ झोनमध्ये समाविष्ट आहे. परिसरात गिधाडांचा अधिवास असून विविध पशूपक्षांचे वास्तव या भागात आहे. प्रस्तावित रोप-वेमुळे यासर्व बाबींची हानी होताना निसर्गालाही धक्का बसले, असे मत पर्यावरणप्रेमींनी बैठकीत मांडले. हे प्रकल्प रद्द करण्याची भूमिका त्यांनी मांडली.
रोपवेसंदर्भातील सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी शर्मा यांनी पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व अन्य संस्थांकडून पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर अभ्यास केला जाईल. या संस्थांकडून प्राप्त होणारा अहवाल व त्यांच्याशी विचारविनिमय करून रोप-वेसंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.
खासदार हेमंत गोडसे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह महसूल, वनविभाग, पर्यटन तसेच संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.