MP Sadashiv Lokhande : खुर्ची नको म्हणत खासदार सदाशिव लोखंडे खालीच बसले!

Water Distribution : समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे नगर, नाशिक जिल्ह्यावर अन्याय
Sadashiv Lokhande
Sadashiv LokhandeSarkarnama

Nagar News: खुर्चीचा मोह कोणाला सुटला नाही. कार्यक्रमात आपल्याला खुर्ची का मिळाली नाही, म्हणून अनेक जण रुसून बसल्याची उदाहरणे आहेत. मात्र, ग्रामस्थांच्या समस्या ऐकण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी खुर्ची नको म्हणत तळवटावर खाली मांडी घालून बसले. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी समस्या ऐकून घेतल्या. त्या सोडवण्याचे देखील आश्वासन दिले.

नेवासा तालुक्यातील अंमळनेर, शिरेगांव, कांगोणी, बऱ्हाणपूर, रस्तापूर, कुकाणा, जेऊर हैबती, नेवासा बुद्रुक येथे विविध कामास कामाचे उद्घाटन व भूमिपुजन यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते झाले. रस्तापूर येथे सभामंडपाचे भूमिजन केल्यानंतर खासदार लोखंडे यांनी व्यासपीठावरील खुर्चीवर बसण्याऐवजी तळवटावर खाली मांडी घालून ग्रामस्थांशी संवाद साधला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sadashiv Lokhande
Muralidhar Mohol News : लोकसभेसाठी पुण्याचा उमेदवार कोण? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं...

समन्यायी पाणी वाटप कायद्यावरून खासदार सदाशिव लोखंडे यांनी टिका केली आहे. या कायद्यामुळे पाऊस कमी झाला तरी घाटमाथ्याच्या भागातून ६५ टक्के पाणी मराठवाड्याला सोडावे लागते. यात नगर आणि नाशिक जिल्ह्याचे हक्काचे ८० टीएमसी पाणी तिकडे जाते. या कायद्यामुळे नगर आणि नाशिक जिल्ह्यावर पाण्याबाबत अन्याय होतो, असे खासदार लोखंडे म्हणाले.

Sadashiv Lokhande
Maharashtra BJP News : मोदींची गॅरंटी देशाला विकासाकडे नेणार...

घाटमाथ्यावरील पाणी वळवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १२ खासदारांचे शिष्टमंडळ भेटले आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे खासदार लोखंडे यांनी सांगितले. नेवासा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन लोखंडे यांच्या हस्ते झाले. शेतकऱ्यांनी त्यांच्या पाण्यासह शेतीप्रश्नांशी निगडीत समस्या मांडल्या. त्यावर उत्तर देताना खासदार लोखंडे यांनी घाटमाथ्यावरील पाणी वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

पाणी वळविण्याची कार्यवाही प्रत्यक्षात झाल्यास त्याचा फायदा सर्वाधिक शेतकरी यांना होणार आहे. त्यातून नगर आणि नाशिक जिल्ह्यातील बळीराजाला मोठी ताकद मिळणार असल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले.खासदार म्हणून पाण्याच्या प्रश्नाला पहिले प्राधान्य दिले आहे.

निळवंडे धरणाचे काम मार्गी लागल्यामुळे १८२ गावांच्या शेती आणि जनावरांच्या पिणाच्या पाण्याचा बिकट प्रश्न मार्गी लागला आहे. आता घाटमाथ्याचे पाणी वळविण्यासाठी माझा लढा सुरू असून पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी जनतेने एकदिलाने सहकार्य करण्याचे आवाहन खासदार लोखंडे यांनी यावेळी केले.

(Edited By Roshan More)

Sadashiv Lokhande
Udayanraje Bhosale : ''शिव स्वराज्य सर्किट’ विकसित करा'' ; उदयनराजेंची पर्यटनमंत्र्यांकडे मागणी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com