Muralidhar Mohol News : लोकसभेसाठी पुण्याचा उमेदवार कोण? मुरलीधर मोहोळांनी सांगितलं...

Loksabha Election 2024 : भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस, नेत्यांमध्ये इव्हेंट वाॅर
Muralidhar Mohol
Muralidhar Moholsarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीत पुणे शहरातून भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चुरस आहे. पक्षाने संधी दिली तर आपण निवडणुक लढू, असे म्हणत सुनील देवधर यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. तर, काही जण मोठे इव्हेंट घेत आपला दावा मजबूत करत आहेत. त्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील लोकसभा निवडणुक लढणार की नाही, यावर थेट भाष्य केलं आहे.

Muralidhar Mohol
Sunil Deodhar : ''...तर पुणे लोकसभा लढवायला मी तयार'' ; सुनील देवधरांचं सूचक विधान!

उमेदवार निवडीबाबत इतर पक्ष आणि भाजपमध्ये फरक आहे. भाजपमध्ये इच्छा व्यक्त केल्याने आणि स्वतःला काय हवं, याला काही महत्त्व नसतं. संघटनेच्या पातळीवरती उमेदवारी बाबत निर्णय घेतला जातो. त्यामुळे कोण इच्छुक आहे कोण नाही, याला कोणताही अर्थ राहत नसल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेमधील काही इच्छुक निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचे सांगत दंड थोपटत आहे. मात्र, सर्वाधिक स्पर्धा ही भाजपमध्येच असल्याचे दिसून येते. त्यातूनच पुण्यातून इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांमध्ये इव्हेंट वॉर सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस पक्षातील इच्छुकांकडून शहरभर पोस्टर लावून आपण देखील मैदानात उतरण्यासाठी तयार आहोत,असा संदेश देत आहेत.

लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले काँग्रेस नेते मोहन जोशी आणि भाजपधून इच्छुक असलेले मुरलीधर मोहळ यांच्या विजयाच्या दाव्यावरून कलगीतुरा रंगला आहे. पुणे लोकसभेचे निवडणूक काँग्रेसचे लढवणार असून ती जिंकणार देखील असल्याचे मोहन जोशी यांना मिडियाला सांगितले. यावर मुरलीधर मोहोळ यांनी जोशी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला आपल्या हातातील राज्य टिकवता आली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून जे काम केले. त्याची पावती विधानसभा निवडणुकांमध्ये नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे पुणे लोकसभा निवडणूक जिंकण्याची स्वप्न काँग्रेसने सोडूनच द्यावी, असा टोला मोहोळ यांनी लगावला.

(Edited By Roshan More)

Muralidhar Mohol
CM Eknath Shinde News : भक्ती-शक्ती संवाद यात्रा महाराष्ट्रात क्रांती घडवेल..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com