संजय राऊत म्हणाले, मी येतोय...निवडणूक तयारीला लागा!

खासदार संजय राऊत यांच्या नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना सूचना
Sanjay Raut with Nashik leaders
Sanjay Raut with Nashik leadersSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : इडीने (ED) अटक केल्यानंतर शंभर दिवसांहून अधिक कोठडीत राहिलेल्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मागील आठवड्यात जामीन मिळाला. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या (Nashik) पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे खासदार राऊत यांची भेट घेतली. मी नाशिकला लवकरच भेट देईन, असे सांगताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (NMC) भगवा फडकविण्यासाठी (Shivsena) सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले. (Sanjay Raut tell office bearers to prepare for local body elections)

Sanjay Raut with Nashik leaders
धक्कादायक; पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांची आत्महत्या

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते.

Sanjay Raut with Nashik leaders
भारत जोडो यात्रेसाठी धुळ्याचे पथक रवाना

खासदार संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळे राऊत यांचा सत्कार करण्यात आला. विरोधकांनी कितीही दडपशाही व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही शिवसेनेचे कार्यकर्ते त्याला दाद देणार नाहीत. सातत्याने विविध प्रयोग एकनाथ शिंदे गटाने केले आहेत. ते सर्व अयशस्वी झाले, असे पदाधिकाऱ्यांनी यावेळी राऊत यांना सांगितले.

चाळीस आमदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतरही नाशिकमध्ये या तोडफोडीची झळ बसली नाही. त्यामुळे खासदार राऊत यांनी शिवसेनेच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. परंतु, यापुढे अशीच एकजूट कायम ठेवून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. येत्या काळात मी लवकरच नाशिकमध्ये येईल, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र पक्षाच्या भगवा फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन त्यांनी केले.

नाशिकमध्ये शिवसेना पक्षाचा विस्तार व शिवसैनिकांची एकजूट टिकून राहिली त्याला संघटन कौशल्य कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com