MP Sujay Vikhe : खासदार सुजय विखेंच्या तोंडवरच सांगितले, कमी मदत करता...

Political News : लाडूचा प्रसादासाठी आम्ही साखर आणि डाळ दिली आहे. तुपासाठी आमदार मोनिका राजळे यांचे तुम्हाला घर माहितीच आहे
Sujay Vikhe
Sujay Vikhe sarkarnama
Published on
Updated on

Nagar : पाथर्डी शहरात कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचा प्रारंभ आणि प्रभू श्रीरामाच्या मूर्ती स्थापनेच्या प्रसादासाठी डाळ व साखर वाटप झाले. या कार्यक्रमाला खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे उपस्थित होते. त्यावेळी आमदार मोनिका राजळे या चांगली मदत करतात. त्या तुलनेत खासदार सुजय विखे कमी मदत करतात, असा आरोप माजी नगरसेवक रमेश गोरे यांनी केला. त्यामुळे विखे पाटील यांची पंचायत झाली. तर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Sujay Vikhe
Prithviraj Chavan : राम मंदिराचे काम अपूर्ण ; तरी निवडणुकीच्या तोंडावर प्राणप्रतिष्ठेची घाई का ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

माजी नगरसेवक रमेश गोरे यांनी कार्यक्रमाच्या स्वागताला खासदार विखे यांच्यावर मदत कमी करत असल्याचा आरोप केला. आमदार राजळे यांच्या पुढाकारातून पाथर्डी (athardi ) शहरातील कसबा विभागात मोठा विकास झाला. या भागाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. खासदार विखे आम्हाला कमी मदत करतात. अभय आव्हाड यांना ते जास्त मदत करतात. आपणही त्यांना मते दिली आहेत, असा गोरे यांनी टोला मारला. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र खासदार सुजय विखे (Sujay Vikhe ) यांची चांगलीच पंचायत झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, सुभाष बर्डे,रमेश गोरे, संजय बडे, सुनील ओव्हाळ आदी उपस्थित होते. आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आपण आणला आहे. विकासकामांना गती दिल्याचे सांगितले.

राजळे यांच्याकडून लाडूसाठी तूप घ्या

"अयोध्यामध्ये २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात होत आहे. या दिवशी आपल्याला मोठा सण देशभर साजरा करायचा आहे. लाडूचा प्रसादासाठी आम्ही साखर आणि डाळ दिली आहे. तुपासाठी आमदार मोनिका राजळे यांचे तुम्हाला घर माहितीच आहे", अशी मिश्किल टिप्पणी खासदार सुजय विखे यांनी केली. पाथर्डी शहरातील प्रत्येक प्रभागातून आम्ही स्पर्धा घेणार असून विजेत्या कुटुंबातील दोन सदस्यांना आमच्या खर्चाने अयोध्या दर्शनासाठी घेऊन जाणार असल्याचे खासदार विखे यांनी येथे जाहीर केले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com