Prithviraj Chavan : राम मंदिराचे काम अपूर्ण ; तरी निवडणुकीच्या तोंडावर प्राणप्रतिष्ठेची घाई का ? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

Meetings held at Congress Bhavan in Satara : मोदींना गांधी घराण्याचा त्याग दिसत नाही आणि अमित शहांची घराणेशाही पण दिसत नाही.
Meetings In Congress Bhavan
Meetings In Congress Bhavan Sarkarnama
Published on
Updated on

Prithviraj Chavan : हिंदू ट्रस्टने लोकांच्याकडून राम मंदिरासाठी पैसे गोळा केले. ते भव्य मंदिर बांधत आहेत. त्यामध्ये वादाचा काही प्रश्न नाही. त्यांचे स्वागत आहे. मंदिर बांधताय काही हरकत नाही. पण मंदिर अजून दोन ते तीन वर्ष पुर्ण व्हायला वेळ लागणार आहे. काम अपूर्ण आहे तरी तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर प्राण प्रतिष्ठा करण्याची घाई का करत आहात, असा सवाल नरेंद्र मोदी यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

तुम्ही शंकराचार्यांना बोलवले नाही. धर्मगुरुंना बोलवले नाही. धार्मिक कार्यक्रम आहे की हा राजकीय कार्यक्रम आहे, हे त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे. मोदी कोणत्या अधिकाराने राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना करत आहेत, असा खरमरीत सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. साताऱ्यात काँग्रेस भवनात आयोजित बैठकी दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Meetings In Congress Bhavan
Maldives Vs India : चीनमधून परतताच मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारताला दिली डेडलाईन; संघर्ष वाढणार?

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, पदाधिकारी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, राम मंदिराच्या जागेचा वाद अनेक वर्ष चालला होता. सुप्रिम कोर्ट जो निर्णय देईल तो सगळे मान्य करु, असे काँग्रेस, भाजप, इतर पक्ष आणि दोन्ही ट्रस्टने सांगितले. सुप्रिम कोर्टाने एक दिवशी न्यायनिवाडा दिला. ती जमीन हिंदू ट्रस्टला दिली असल्याचे चव्हाणा यांनी सांगितले. तर नक्कीच हिंदूत्वाच्या मुद्दावर येवू घातलेल्या लोकसभेच्या निवडणूका मोदी लढवत आहेत.

त्यांच्याकडे मुद्दाच नसल्याचे चव्हाण म्हणाले. 2014 ला मोदी पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी ही निवडणूक आर्थिक विषयावर लढवली. अच्छे दिन आयोगें, 15 लाख रुपये आणणार, दोन कोटी रोजगार देणार, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणार अशा सगळ्या घोषणा केल्या. तो त्यांचा कार्यक्रम नोटबंदीमुळे, जीएसटीमुळे सपशेल फेल गेला. दुसऱ्या पाच वर्षात 2019 ला त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बाहेर काढला.

मोदी है तो मुमकीन है, 56 इंच छाती है असे बोलले. पुलवामा झाले. पुलवामा करण्यामध्ये कोणाचा हात होता ? जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल बोलताहेत. त्या घटनेचे विष्लेषण करायला कोणी तयार नाही. जे 40 सैनिक हुतात्मा झाले ते कशामुळे झाली. त्यात कोणाची चुक होती. त्याकडे कोणी जाणून बुजून दुर्लक्ष केले. त्यावर एक सुद्धा उत्तर मिळाले नाही. चीनने आक्रमण करुन आपले 20 सैनिक मारले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतच्या भूमीवर आक्रमण करुन त्यांनी छावण्या उभारल्या. त्यावर मोदी काहीच बोलत नाहीत. उलट लोकसभेत म्हणाले की चीन भारतात आलेल नाही, असे त्यांनी जाहीरपणे वक्तव्य केले. त्याची चर्चा ते होवू देत नाही. चर्चा करायचा प्रयत्न केला तर चर्चा बंद करतात. खासदारांना निलंबीत करतात. पार्लमेंटची सुरक्षा तुम्ही ठेवू शकत नाही. राम मंदिर पुर्ण न होता तेथे प्राणप्रतिष्ठापना करताहेत त्या सोहळ्याला राष्ट्रपतींना बोलवत नाही.

धर्मगुरूंना बोलवत नाही. मोदींना बोलवता यावरून स्पष्ट राजकारण करता हे लोकांना कळले आहे, अशी घणाघाती टीका चव्हाण यांनी केली आहे.

मोदींना गांधी घराण्याचा त्याग दिसत नाही

मोदींना बोलणं सोपं असले तरी त्यांच्या शेजारी व्यासपीठावर बसत असलेल्या अमित शहांची घराणेशाही दिसत नाही. अनुराग ठाकुर कोण आहेत. अमित शहाची मुल कशी सेटल झाली. महाराष्ट्रात उदाहरण घेतली तर किती बापलेकांचे प्रतिनिधीत्व आहे.

फक्त वडीलांचा मुलगा आहे म्हणून काम करताहेत. मला वाटते की कार्यक्षमतेप्रमाणे संधी दिली पाहिजे. उगाच घराणेशाहीच ने नाव घेवून गांधी फॅमीलीला टार्गेट करण्यापलिकडे मोदी काही करत नाहीत. गांधी घराण्याचे कतृत्व त्यांनी बघाव, त्यांचे बलिदान बघाव, आज मोदी साहेब राजीव गांधी यांचे बलिदान विसरले काय, इंदिरा गांधी यांचे बलिदान विसरले काय, त्यांनी अमित शहांसारखे मुलाला इमले उभारण्यासाठी वापर केला नाही. त्यामुळे ही लढाई ताकदीने लढली जाणार आहे, अशी त्यांनी टीका केली.

लोकसभेच्या तिकीटाचा निर्णय दिल्लीतून ठरणार

इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत. काँग्रेसची दिल्ली येथे खर्गे याच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीत पाच जणांची समिती निवडण्यात आली आहे. ती पाच जणांची समिती देशातील आमदारांची बैठक, आढावा घेत आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या तिकीटाबाबत निर्णय होणार आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Meetings In Congress Bhavan
Solapur BJP Politics : सोलापूरसाठी लक्ष्मण ढोबळेंची मोर्चेबांधणी सुरू; भाजपच्या निर्णयाकडे लक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com