Nagar Political : पाथर्डी नगरपालिका इमारतीच्या सुशोभिकरणाचे काम नियमबाह्य ?

Beautification of municipal building : प्रशासन आणि माजी नगरसेवक रमेश गोरे यांच्यात आरोपांच्या फैरी
Municipal Building
Municipal BuildingSarkarnama
Published on
Updated on

Nagar Political : पाथर्डी नगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या सुशोभिकरणाच्या नियमबाह्य कामावरून प्रशासन आणि माजी नगरसेवक रमेश गोरे यांच्यात आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. कार्यारंभ आदेश नसताना नियमबाह्यपद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप करत नगरसेवक गोरे यांनी केला आहे. तर सध्या जे काम सुरू आहे. ते पूर्वीचा ठेकेदार करत आहे. नवीन कामाची निविदेची प्रक्रिया लवकर राबवली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी दिली.

पाथर्डी नगरपालिकेची नवीन इमारतीच्या बाहेरील बाजूस कोट्यवधी रुपये खर्चून सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. हे काम आता वादाच्या भोवऱ्यात सापडले असून जवळपास दीड कोटी रुपये खर्चाचे हे काम नियमबाह्य सुरू असल्याचा आरोप सुरू झाला आहे. हे काम नियमानुसार चालू असल्याचा दावा मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी केला आहे.

Municipal Building
Sanjay Raut : मोदींनी पंतप्रधान पदाचा मान राखून तसे वागावे ! राऊतांची खोचक टीका...

पाथर्डी शहरात अजंठा चौक या ठिकाणच्या वीर सावरकर मैदानावर सध्या पालिकेच्या नवीन इमारतीचे काम चालू आहे. पाथर्डी शहराच्या वैभवात भर पडणाऱ्या या कामाचा लोकार्पण सोहळा पुढील महिन्यात होणे अपेक्षित आहे. सध्या येथील इमारतीचे काम पूर्ण झाले असले, तरीही ही इमारत बाहेरूनही सुंदर दिसावी म्हणून दीड कोट रुपये खर्चून सध्या एक्रोलिक पॅनेलिंग आणि काचेचे काम सुरु करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे काम निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच सुरु करण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक रमेश गोरे यांनी केला आहे. मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या म्हणण्यानुसार सध्या जे काम सुरु आहे, त्याचा ठेका या इमारतीचे काम करणाऱ्या ठेकेदारालाच दिला आहे. त्याने ज्या ठेकेदाराला हे काम दिले तो, ठेकेदार हे काम करत आहे. हे काम इमारतीच्या केवळ दीड बाजूचे आहे तर उर्वरित बाजूचे जे काम आहे. त्या कामाची निविदा प्रसिद्ध केली असून येत्या सोमवारी निविदा उघडण्यात येणार आहे.

यानंतर उर्वरित कामाला सुरूवात केली जाणार आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी सुशोभिकरणाचे जे काम चालू आहे ते जवळपास पन्नास टक्के पूर्ण झाले आहे. नगरपालिकेतील लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याकडे प्रशासकीय पदभार आला आहे. नगरपालिका प्रशासकाच्या कार्यकाळातील अनेक विकास कामे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

(Edited by Amol Sutar)

Municipal Building
Tanaji Sawant News : मंत्री तानाजी सांवत आमदारांचा निधी वापरून 'ट्रान्सफार्मर बँक' उभी करणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com