Shrigonda Politics : '' विधानसभेला माझ्या जोडीला कोणता 'आर' द्यायचा हे...''; विखेंचे मोठे संकेत,श्रीगोंद्यात गणित बदलणार?

MP Sujay Vikhe Patil News : '' श्रीगोंद्याचे राजकारण समजण्यापलीकडचे आहे... ''
Shrigonda Politics
Shrigonda PoliticsSarkarnama
Published on: 
Updated on: 

संजय काटे

Shrigonda : श्रीगोंद्याचे राजकारण न समजण्यापलीकडचे आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी सगळ्यांच्या तोंडी आहे. यातच माझ्यावरचं प्रेम समजलं. आता माझ्या जोडीला राहूल जगताप द्यायचे की राजेंद्र नागवडे हे जनताच ठरवेल. जो मिळेल त्याच्या सोबत मी आहेच असं म्हणत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच अप्रत्यक्षपणे मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे श्रीगोंद्यात राजकीय समीकरणं बदलणार का अशा चर्चा जोर धरु लागली आहे.

काष्टी (ता. श्रीगोंदे) येथे राकेश पाचपुते व संजय काळे यांच्या 'एस आर' सिनेमागृहाचे उद्घाटन डॉ. खासदार सुजय विखे पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी श्रीगोंद्याच्या राजकारणावर भाष्य केलं. विखे पाटील म्हणाले, श्रीगोंद्या(Shrigonda)चे राजकारण समजण्यापलीकडचे आहे. दिवसाला बदलणाऱ्या राजकारणावर जर पिक्चर काढला तर आपण कोटभर रुपये त्यासाठी खर्च करु हे असं विनोदानं जाहीर करतानाच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Shrigonda Politics
Sharad Pawar Threat Case : शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून एका आयटी इंजिनिअरला अटक ; दोन्ही अकाउंट..

यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, जेष्ठ नेते कैलास पाचपुते, दीपक नागवडे, अतुल लोखंडे, बाळासाहेब गिरमकर, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे उपस्थित होते.

'' राजकारणावर पिक्चर काढू...''

खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe Patil) यांनी आपल्या भाषणात विखे यांनी श्रीगोंद्याचे राजकारण शेलक्या शब्दात उलगडून दाखवले. टीडीएम या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे तेथे बसले होते. त्यांच्याकडे पाहत विखे म्हणाले, भाऊसाहेब तुम्ही श्रीगोंद्याचे भुमिपुत्र आहात. येथील राजकारण देशात गाजत असताना तुम्हाला या राजकारणावर चित्रपट काढावा असं का वाटलं नाही. या चित्रपटासाठी कोटीचा खर्च मी करतो. आपण तो एकत्र पिक्चर काढू असंही उपरोधिकपणे विखे पाटील यावेळी म्हणाले.

Shrigonda Politics
Sarathi Breaking News : राज्य सरकार आणि 'सारथी'च्या निष्काळजीपणाचा फटका; मराठा विद्यार्थ्यांचं 'ते' स्वप्नं भंगणार?

''आम्हालाच काय कुणालाच...''

नेत्यांची वाढती संख्या, त्यांचा रोज बदलणारा पक्ष, गट-तट, चिन्ह हे सगळेच न समजण्यापलीकडचे आहे. हा चित्रपट जर काढला तर त्याचे दहा भाग करावे लागतील. कारण येतील राजकारण एका भागात संपणारं नाही. आम्हालाच काय कुणालाच येथील राजकारण आणि नेते, कार्यकर्ते समजले नाहीत. त्यामुळे श्रीगोंद्याच्या राजकारणातील खलनायकाची भुमिका कुणाला द्यायची हेही ठरवावं लागेल असे सांगत श्रीगोंद्याच्या राजकारणाचा खरा पिक्चरच त्यांनी लोकांसमोर विखे यांनी मांडला.

...हे जनताच ठरवेल!

'एसआर' नावावर विश्लेषण करत खासदार विखे म्हणाले, या नावाबद्दल अनेकांनी मते मांडली. त्यात सुजय म्हणजे मी सगळ्यांच्या तोंडी आहे. यातच माझ्यावरचे प्रेम समजले. आता माझ्या जोडीला राहुल जगताप(Rahul Jagtap) द्यायचे की राजेंद्र नागवडे हे जनता ठरवेल. जो मिळेल त्याच्या सोबत मी आहेच असे सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवत विखे यांना दाद दिली..

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.