Mukesh Shahane Nashik : भाजपचेच होते पण अपक्ष लढले, बडगुजरांच्या मुलाचा पराभव केला ; ते मुकेश शहाणे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटात

Mukesh Shahane joins Ajit Pawar's NCP after winning as independent: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गट नोंदणीत अपक्ष निवडून आलेले नगरसेवक मुकेश शहाणे यांचा समावेश करण्यात आला आहे. शहाणे यांची भाजपमधून हकालपट्टी झालेली आहे.
Sudhakar Badgujar |Mukesh Shahane
Sudhakar Badgujar |Mukesh ShahaneSarkarnama
Published on
Updated on

Nashik NMC Election Results 2026: उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गट नोंदणी लांबणीवर पडली होती. २८ जानेवारी रोजी गटनोंदणीसंदर्भात पक्षाने बैठक बोलावली होती मात्र दादांच्या विमान अपघातामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती. दरम्यान महापौर पदाची निवडणूक होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कडून सोमवारी (ता.२) विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी करण्यात आली.

नाशिक महापालिकेत राष्ट्रवादीचे (अजित पवार) अवघे चार नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सीमा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गट नोंदणीत अपक्ष निवडून आलेले नगरसेवक मुकेश शहाणे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

मुकेश शहाणे हे भाजपचेच होते. मात्र, एबी फॉर्मच्या गोंधळात त्यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे त्यांना भाजपची अधिकृत उमेदवारी मिळू शकली नाही. प्रभाग क्रमांक 29-अ मधून भाजपचे नेते सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांच्या विरोधात त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे पक्षातून त्यांची हकालपट्टी झाली. मात्र शहाणे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली व निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार दिपक बडगुजर यांचा दारुण पराभव केला. त्यामुळे नाशिकमध्ये ही निवडणूक मोठी चर्चेची व हायव्होल्टेज लढत ठरली.

Sudhakar Badgujar |Mukesh Shahane
NCP Merger : विलीनीकरणाचा निर्णय घेताना भाजपला विश्वासात घ्यावं लागेल, छगन भुजबळांच्या विधानामागचं नेमकं राजकारण काय?

त्यानंतर अपक्ष निवडून आलेले नगरसेवक मुकेश शहाणे स्वतंत्र गटनोंदणी करता की नेमका काय निर्णय घेतात याकडे लक्ष्य लागले होते. अशात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार) गटाची निवड केली असून राष्ट्रवादीबरोबरच गटनोंदणी केली आहे. एका नगरसेवकाची भर पडल्याने राष्ट्रवादीचे तौलानिक बळ आणखी वाढले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे चार व अपक्ष एक असे पाच नगरसेवक पक्षाचे नेतृत्व सभागृहात करणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या जेष्ठ नगसेविका डॉ. हेमलता पाटील या पक्षाच्या गटनोंदणीवेळी गैरहजर होत्या. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. गटनेतेपदासाठी त्या इच्छुक होत्या. मात्र पक्षाकडून गटनेतेपदासाठी सीमा रंजन ठाकरे यांच्या नावाचे पत्र आले. यावर व्यक्तिगत कारणास्तव डॉ. हेमलता पाटील गटनोंदणीला हजर नव्हत्या त्या कधीही गटात आपले नाव नोंदवू शकतात असे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Sudhakar Badgujar |Mukesh Shahane
Ajit Pawar death : स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिंचे नाशिकच्या रामकुंडात विसर्जन

दरम्यान भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व मनसे या पक्षांची विभागीय आयुक्तांकडे यापूर्वीच गट नोंदणी करण्यात आली आहे. नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक ६ फेब्रुवारीला होणार आहे, त्याकडे लक्ष्य आहे. तसेच भाजप शिवसेना-राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करुन घेणार का हेही पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com