Cow vigilante violence : गोरक्षकाच्या हल्ल्यात अफान अन्सारीचा मृत्यू, पीडितेचा एक कोटीचा दावा; खटला चालणार जलदगतीने, राज्य सरकार देणार भरपाई

Mumbai High Court Orders Maharashtra Government on Afroz Ansari Petition Over Afan Ansari Death in Nashik Cow Vigilante Attack : गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीमुळे पती गमावलेल्या कुर्ला इथल्या याचिकाकर्तीला अंतरिम भरपाई देण्याची ग्वाही राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली.
Cow vigilante violence
Cow vigilante violenceSarkarnama
Published on
Updated on

Nashik cow vigilante attack : अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) इथून 450 किलो गोमांस खरेदी करून त्याची वाहतूक केल्याच्या संशयावरून, गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात अफान अन्सारी (वय 34) यांचा मृत्यू झाला होता. इगतपुरी इथल्या दंडाधिकाऱ्यासमोरील खटला आता, नाशिक सत्र न्यायालयात सुरू आहे.

दरम्यान, मयत अफान यांच्या पत्नी अफरोज (वय 24, रा. कुर्ला, मुंबई) यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत, सर्वोच्च न्यायालयातील हिंसाचार प्रकरणाचा संदर्भ देत, नुकसान भरपाईपोटी एक कोटी अन् खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली आहे. यावर राज्य सरकारने पीडिताला दहा लाख रुपये देण्यात येणार असून, अंतरिम पाच लाख रुपये खाते उघडताच, लगेच हस्तांतरित केले जातील, असे न्यायालयाला सांगितले आहे.

कुर्ला स्थित याचिकाकर्ती अफरोज यांनी मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयात पत्नी अफान यांच्या मृत्यूप्रकरणी याचिका दाखल केली होती. अफान यांचा मृत्यू गोरक्षकांच्या हल्ल्यात झाला होता. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना अफरोज यांनी, हसीन पूनावाला या सामूहिक हिंसाचाराच्या प्रकरणातील खटले लवकरात लवकर निकाली निघावे, प्रत्येक जिल्ह्यात जलदगती न्यायालये स्थापन करावीत, असे सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिले होते, याचा संदर्भ दिला होता.

नाशिक (Nashik) इथल्या सत्र न्यायालयासमोर प्रलंबित खटला सहा महिन्यांत पूर्ण करण्याने आणि खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्याचे तसेच भरपाई म्हणून एक कोटी रुपयांची मागणी अफरोज यांनी याचिकेद्वारे केली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.

Cow vigilante violence
Arjun Khotkar firecracker comparison : फडणवीस, शिंदे अन् पवार 'सुतळी बॉम्ब', उद्धव वाजलाच नाही, राज 'स्फोटक', तर राऊत 'भुई चक्कर'; अर्जुन खोतकरांनी फोडले फटाके

त्यावेळी अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी महाराष्ट्र भरपाई योजना, 2014मध्ये सुधारणा करण्याबाबत जानेवारी 2022ची अधिसूचना सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयात सादर केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकारने सामूहिक हिंसाचारामुळे झालेले नुकसान आणि दुखापत, असे कलम समाविष्ट केले असून, त्यानुसार 10 लाख रुपये भरपाई पीडितांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

Cow vigilante violence
Imtiaz Jaleel : पराभवानंतरही आमची ताकद वाढली, इम्तियाज जलील यांचा दावा; एमआयएम सगळ्या निवडणुका स्वबळावर लढणार!

नेमकी घटना काय

अफरोज अन् अफान अन्सारी यांना आठ आणि पाच वर्षांच्या दोन मुली आहेत. याचिकेनुसार, 24 जून 2023 रोजी अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) मध्ये 450 किलो गोमांस खरेदी केल्याच्या संशयावरून अफान आणि त्याचा चालक नासीर कुरेशी यांना समृ‌द्धी एक्स्प्रेसने मुंबईला परताना त्ंयाचा पाठलाग करून सुमारे 14 ते 15 जणांनी दोघांचे हात-पाय बांधून, लाकडी दांडगे, लोखंडी राॅडने मारहाण केली. यावेळी त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू आणि फोन हिसकावून घेतले. पोलिस आल्यानंतर त्यांनी या दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. यानंतर अफानला मृत घोषित केले.

गोरक्षकांच्या गटातील अकरा जणांवर हत्येचा आरोप

नाशिक ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करताना, गोरक्षकांच्या गटातील अकरा जणांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढताना, खटला जलदगतीने चालवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकार कारवाई करणार आहे. पुढील तीन आठवड्यात ही कार्यवाही होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com