Narahari Zirwal: प्रसाद असलेले पेढे अचानक बाजारातून गायब का झाले? मंत्री झिरवाळ यांनी सांगितले धक्कादायक कारण!

Mumbai Legislative Assembly Adulteration Minister Narhari Jirwal Statement Commissioner Tukaram Mundhe Action- भेसळ रोखण्यासाठी जुन्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी केली तरी पुरेसे!
Narhari-Zirwal
Narhari-ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Tukaram Munde Effect: दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीवर विधिमंडळात शुक्रवारी जोरदार चर्चा झाली. भेसळ रोखण्यासाठी शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावेळी अन्न आणि औषध विभागाकडून सुरू असलेल्या कामाची ही चर्चा झाली.

राज्यात खाद्यपदार्थ आणि विविध घटकांमध्ये भेसळ सुरू आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर हा विभाग अचानक चर्चेत आला आहे. सध्या राज्यात धडाकेबाज कारवाईमुळे या विभागाचे महत्त्व देखील अधोरेखीत होत आहे.

यासंदर्भात सदस्यांनी उपस्थित केलेला प्रश्नावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भेसळ रोखणे ही काळाची गरज आहे. भेसळीमुळे अनेक दुष्परिणाम ओढवतात. मी आरोग्यावर अतिशय विपरीत परिणाम झाल्याचे मंत्र्यांनी सांगितले. 

Narhari-Zirwal
Nashik Food Safety : धक्कादायक! प्रतिष्ठितच करतात दुधात भेसळ, नागरिकांच्या जीवाशी खेळ; दुधाचे 16 तर दुग्धजन्य पदार्थांचे 38 नमुने सदोष...

सध्या अनेक व्याधी आणि भेसळीमुळे कर्करोगासारखे आजार पसरत आहेत. दहा पाच वर्षांच्या लहान मुलांमध्येही कर्करोग आढळला. मुलांच्या मातांना देखील कर्करोगाची बाधा झाल्याचे दिसले. प्रकार रोखणे समाजापुढील प्राधान्याचे काम आहे. 

Narhari-Zirwal
Food Adulteration Scam : 20 लाखांचे भेसळयुक्त तेल; भेसळीच्या रॅकेटला सरकारचाच आशीर्वाद; सत्ताधारी आमदाराचाच गंभीर आरोप

राज्य शासन याबाबत विविध उपाय योजना करीत आहे. अन्न आणि औषध प्रशासन त्यासाठी जागरूक होऊन काम करेल. हे केवळ शासकीय काम नसून पुण्याचे काम देखील आहे. भेसळ रोखल्यास त्याचा समाजाला विविध स्तरावर फायदा दिसून येईल, असे मंत्री झिरवाळ म्हणाले. 

अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यात प्रत्येकाला दूध आणि दुधातील भेसळ याविषयी कल्पना आहे. अनेक ठिकाणी प्रसाद म्हणून पेढा दिला जातो. सध्या मात्र बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून पेढा गायब झाला आहे. त्याचे कारण देखील मंत्री झिरवाळ यांनी सांगितले. 

पेढ्यामध्ये विविध प्रकारे भेसळ होत असल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी बटाटा आणि गाजर याचा वापर करून पेढा तयार केल्याचे आढळले आहे. यावर अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाने कठोर पावले टाकली आहेत. त्यामुळे बाजारात कारवाईच्या भीतीने पेढा गायब झाला असावा. 

भेसळ रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र वारंवार त्याचा पुनरुच्चांक करणे मला बरे वाटत नाही. राज्यात 11 लाख मेडिकल स्टोअर्स आहेत. एका दुकानांसाठी एक निरीक्षक आवश्यक असतो. त्यादृष्टीने अकराशे निरीक्षकांची गरज आहे.

प्रत्यक्षात मात्र दोनशेच जण हे काम करीत आहेत. त्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. दोन वेळा त्यात त्रुटी आढळल्याने आता त्यात देखील दुरुस्त्या करण्यात आल्याचे, मंत्री म्हणाले. प्रत्येक वेळी नवे कायदे आवश्यक नाहीत. जुन्या कायद्यांची कठोर अंमलबजावणी केली तरीदेखील भेसळ नियंत्रणात येईल, असा दावा देखील मंत्री झिरवाळ यांनी केला. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com