Nashik News, 14 Jun : अन्न आणि औषध प्रशासनाचा कारभार तुकाराम मुंढे यांनी हाती घेतला. त्याचे परिणाम सबंध राज्यभर दिसू लागले आहेत. अन्न व औषध प्रशासन सक्रिय झाल्याने अनेक धक्कादायक प्रकार पुढे येत आहेत.
तुकाराम मुंढे सक्रिय झाल्याने अन्य यंत्रणांवरही दबाव निर्माण झाला आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. दुधाचे 16 तर दुग्धजन्य पदार्थांचे 38 नमुने अप्रमाणिक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुजरात, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून दूध पुरवठा होतो.
गुजरातशी संबंधित अनेक मिठाईचे व्यापारी येथे कार्यरत आहेत. त्यामुळे आर्थिक व व्यापारी फायद्यासाठी नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ उघड झाला. दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्या अध्यक्षा हेमांगी पाटील यांनी याबाबत नुकतीच माहिती दिली. दूध आणि दुग्ध जन्य पदार्थांतील भेसळ या निमित्ताने किती भयानक प्रकारात सुरू आहे हे पुढे आले. या समितीच्या आढावा बैठकीत माहिती देताना समितीच्या कामकाजावरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या समितीने यापूर्वी गांभीर्याने काम केले की नाही असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे समितीच्या सदस्यांचेही कामकाज वादात सापडण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात झालेली कारवाई खूपच कमी असल्याचे पाटील यांचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
दुधापासून बनविण्यात येणारे विविध पदार्थ आणि मिठाई यामध्ये 38 नमुने व अप्रामाणिक असल्याचे समोर आले आहे. यातील एक नमुना कोणताही लेबल लावलेला नव्हता. त्यामुळे असे प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार तुकाराम मुंडे यांनी स्वीकारल्यावर राज्यभर कारवाईचे आणि धाडींचे सत्र सुरू झाले. त्यामुळे राज्यभर हा विभाग पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर.
हा विभाग अतिशय महत्त्वाचा असला तरी कर्मचारी संख्या मर्यादित आहे. ही त्यांच्या कामातील प्रमुख अडचण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर समितीने दुग्ध शाळा आणि मिठाईच्या दुकानांची तपासणी करणे, जिल्हा व राज्य बाहेरून येणाऱ्या दुधाची गांभीर्याने तपासणी करणे, करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर गंभीर कारवाई करणे आणि यासंदर्भात दर महिन्याला कामकाजाचा अहवाल जाहीर करणे, हे महत्त्वाचे निर्णय झाले आहेत.
खाद्यपदार्थ आणि विशेषत: दुधात होणारी भेसळ ही थेट नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. यापूर्वी मंत्री नरहरी शिरवळ यांनी ठाणे येथे मुंबईच्या सीमेवर अशा खुद्द तपासणी केली होती. भल्या पहाटे मंत्री खुद्द तपासणीसाठी सक्रिय झाल्याने तो चर्चेचा विषय बनला होता. आता त्याच विभागात तुकाराम मुंढे या धडाडीच्या अधिकाऱ्याची चर्चा आहे. त्याचा परिणाम राज्यभरातील अन्य यंत्रणांवरही दिसू लागला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.