Bachchu kadu News : दिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठीच माझे राजकारण!

My politics is only to make the disabled self-reliant-आमदार बच्चू कडू यांनी सिन्नर येथे प्रहार दिव्यांग संघटनेच्या मेळाव्यानंतर माहिती दिली.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama

Prahar Sanghtana News : मी सध्या दिव्यांगासाठी सुरू केलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी दौरा करीत आहे. दिव्यांगांना विश्वास आणि स्वयंपूर्ण बनविणे यावर मी लक्ष केंद्रीत केले आहेत. त्यासाठीच माझे राजकारण आहे, असे माजी मंत्री बच्चू कडू यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

आमदार बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी नुकताच नाशिक, (Nashik) धुळे, (Dhule) नंदूरबारसह विविध भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी दिव्यांगासाठी विविध व्यक्तीगत लाभाच्या योजनेतील वस्तूंचे वाटप केले.

Bachchu Kadu
Nashik Congress News : राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढणार!

सिन्नर येथे आमदार कडू यांच्या उपस्थितीत दिव्यांगांचा मेळावा झाला. यावेळी त्यांनी आपल्या दौऱ्याची माहिती दिली. सिन्नर दिव्यांग कमिटीला आदर्श प्रहार भूषण पुरस्कार मिळाल्याची बाब अभिमानास्पद आहे. प्रत्येक दिव्यांग बांधव स्वाभिमानी व स्वावलंबी बनविण्यासाठी आपले प्रयत्न आहेत, असे सांगितले.

पुरवठा विभागाने दिव्यांगासाठी पत्रिका तयार केल्या होत्या. संजय गांधी योजनेची १०० प्रकरणे मंजूर झाल्याची माहिती संघटनेने दिली. तालुक्यात ५ टक्के निधी दिव्यांगांना वाटप केल्याचे सांगण्यात आले. आमदार कडू यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

Bachchu Kadu
Girish Mahajan News : वादग्रस्त पोस्ट टाकल्याने धुळ्यात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल!

ते म्हणाले, दिव्यांगांसाठी अतिरिक्त अन्नधान्याचा लाभ मिळावा, यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बोलणे झाले असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले. दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकुल योजना असावी, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाल्याचे ते म्हणाले. दिव्यांगासाठी अनेक योजना व कायदे आहेत. दिव्यांगांच्या लाभासाठी निधी कमी पडणार नाही याचा मला विश्वास आहे.

Bachchu Kadu
Dhule Congress News : ‘इंडिया’चा केंद्र, राज्य सरकारने घेतला धसका!

यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे, सीमंतिनी कोकाटे, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, तालुका प्रभारी जयंत आव्हाड, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, प्रहारचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष बापूराव कान्हे, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली, राज्य समन्वयक संध्या जाधव, नायब तहसीलदार वराडे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com