Nashik Farmers News : कांद्याचे भाव कमी असताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना विनंती केल्यावर त्यांनी लाल कांद्याची खरेदी केली. लाल कांदा खरेदीची व्यवस्था नव्हती. आता केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यात बदल केले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. (Now centre have changed onion purchasing policy through NAFED)
कांदा दर कोसळत असल्याने नाशिकचे (Nashik) शेतकरी (Farmers) अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने (Centre Government) दोन लाख अतिरीक्त लाल कांदा खरेदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा दावा केला जात आहे.
‘नाफेड’तर्फे खरेदी करण्यात आलेला आणि ‘बफर स्टॉक’ केलेल्या तीन लाख टन कांदा मागणीनुसार घरगुती वापरासाठी इतर राज्यांकरिता दिला जाणार असल्याचे डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.
‘नाफेड’तर्फे राज्यातील कांद्याच्या आगारात कांदा खरेदी केला असला, तरीही इथं कांदा दिला जाणार नाही. त्यासंबंधाने माझे ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचे कारण नाही. इथं खरेदी केलेला कांदा इथं विकून ‘नाफेड’तर्फे कांद्याचे भाव पाडले जाणार नाहीत, असाही निर्वाळा डॉ. पवार यांनी दिला आहे.
कांदा दर स्थिर झाले
शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगले पैसे मिळत असताना ‘नाफेड’तर्फे ‘बफर स्टॉक’मधील कांदा बाजारात आणून भाव पाडण्यात येणार असल्याच्या तक्रारींना तोंड फुटले होते. अशा परिस्थितीत नाफेडने खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारपेठेत येणार नाही. त्यामुळे भाव कोसळणार नाही, असे स्पष्टीकरण देत डॉ. पवार यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. त्याचवेळी बाजारात कांदा दर ‘जैसे थे' अर्थात स्थिर राहिले.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला क्विंटलभर कांद्याला सरासरी भाव पुण्यात एक हजार ७५०, लासलगावमध्ये दोन हजार २८०, पिंपळगाव बसवंतमध्ये दोन हजार ३५० रुपये असा राहिला होता. आज पुण्यात एक हजार ७५०, लासलगावमध्ये दोन हजार ३०१, पिंपळगाव बसवंतमध्ये दोन हजार ३५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांद्याची विक्री झाली. मनमाडमध्ये क्विंटलभर कांद्याचा आज सरासरी भाव दोन हजार ४०० रुपये असा राहिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.