Dada Bhuse News : दादा भुसेंची सूचना नेत्यांनी अव्हेरली, गिरीश महाजन यांनी पाळली!

BJP Minister Girish Mahajan responded to Dada Bhuse`s appeal-दादा भुसे यांनी बचत गटाच्या प्रदर्शनामध्ये प्रत्येकाने एक हजार रुपयांची खरेदी करावी अशी सूचना केली होती.
Girish Mahajan & Dada Bhuse
Girish Mahajan & Dada BhuseSarkarnama

Nashik News : जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने आदिवासी शेतकरी आणि व बचत गटांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रत्येकाने किमान एक हजार रुपयांची खरेदी करावी असे आवाहन केले होते. त्याचे पालन केवळ एका नेत्याने केले, ते म्हणजे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन. (Girish Mahajan responded to Guardian minister Dada Bhuse`s Appeal for Purchasing)

नाशिक (Nashik) येथे झालेल्या रानभाज्यांच्या प्रदर्शनाला पालकमंत्री दादा भुसे (Dada bhuse) आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भेट दिली. येथे आदिवासी बांधवांनी (Trible) देखील रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या.

Girish Mahajan & Dada Bhuse
Nashik NCP News: शरद पवार गटाने एका रात्रीत उभारले नवे राष्ट्रवादी भवन!

या प्रदर्शनाच्या विविध स्टॉल्सना मंत्र्यांनी भेट दिली. तत्पूर्वी भाषणामध्ये पालकमंत्री भुसे यांनी प्रत्येकाने किमान एक हजार रूपयाची खरेदी करावी, असे आवाहन केले होते. या दोन्ही मंत्र्यांभोवती त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा गराडा होता. त्यामुळे बचत गटाच्या महिलांमध्ये आता भरपूर विक्री होईल अशी आशा पल्लवीत झाली.

महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे यांनी महोत्सवातून सर्वांनी हजार रुपयांची खरेदी करावी, अशी ताकीद दिली होती. थोड्या वेळाने मंत्री विविध स्टॉलला भेट देत निघून गेले. तसे त्यांच्याबरोबर आलेली गर्दीही निघून गेली, मात्र कोणीही हजार रुपयांची खरेदी केली नाही. पालकमंत्र्यांच्या सूचनेला एकाही पदाधिकारी, कार्यकर्त्याने प्रतिसाद दिला नाही.

Girish Mahajan & Dada Bhuse
Sharad Pawar In Beed: धनंजय मुंडे समर्थकांची हवा टाईट ? | NCP | Sarkarnama

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन त्याला अपवाद ठरले. त्यांनी काही स्टॉलवर रोखीने खरेदी केली. साडेतीन हजारांच्या पाणवेलीपासून बनविलेल्या वस्तू त्यांनी खरेदी केल्या. तत्त्व या बॅण्ड अंतर्गत असलेल्या अडीच हजारांच्या बेडशीटची, नागली बिस्कीट, शेळीच्या दुधापासून बनविलेला साबण, विविध प्रकारचे मसाले, भाजीपाला अशी एकूण १२ हजार ५०० रुपयांची खरेदी केली. त्यांच्या पाठोपाठ इतर पदाधिकाऱ्यांनीही रोख खरेदी केली. भुसे यांची सूचना त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी अव्हेरली, मात्र मंत्री महाजन यांनी पाळली,

यावेळी ग्रामविकासमंत्री महाजन यांनी महिला बचत गट सक्षमीकरणासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून, बचत गटांना सुरवातीस भांडवल स्वरूपात दिला जाणारा फिरता निधी दुप्पट केला जाईल. त्यामुळे आता बचत गटांना १५ हजारांऐवजी ३० हजार रुपयांचा निधी मिळेल अशी घोषणा देखील केली.

Girish Mahajan & Dada Bhuse
NCP News : नवाब मलिक यांनी राजकीय संकेत दिलेच नाहीत !

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) वर्षा फडोळ, नाशिक लोकसभेचे समन्वयक केदा आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील बच्छाव, प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com