Nagar Political : ‘ती’ चूक सुधारणार; राष्ट्रवादीच्या कळमकरांचे भाजपच्या सत्कारात सूचक वक्तव्य...

Unite to change the dire situation in the city : शहरात निर्माण झालेली बिकट परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्व एक होऊ.
Dada Kalamkar
Dada KalamkarSarkarnama
Published on
Updated on

Nagar Political : "नगर शहरात 1972 पासून राजकारण करताना कुठेही कटूता येणार नाही, याची काळजी घेतली. सर्वांना बरोबर घेत सर्व पक्षांशी चांगले संबंध जपले. राजकारणापेक्षा मैत्री जपली. मात्र काही वर्षांपूर्वी एक खूप मोठी चूक झाली. त्यामुळे आपले नगर शहर बदनाम झाले आणि मागे गेले. ती चूक सुधारायची असून, ती वेळ आली आहे," अशी सूचक प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते माजी आमदार शरद पवार गटाचे दादा कळमकर यांनी व्यक्त केली.

दादा कळमकर (Dada Kalamkar) म्हणाले, "वसंत लोढा म्हणाले ते खरे आहे. आता पुन्हा ती चूक करणार नाही. ही चूक सुधारण्याची संधी आलेली आहे. शहरात निर्माण झालेली बिकट परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्व एक होऊ. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर काहीही निर्णय होऊदेत. पक्षीय मतभेद बाजूला ठेवू. याला माझी तयारी आहे. शहराचा आमदार व महापालिकेचे सत्ताधारी एकाच विचाराचे असावेत, तरच शहराचा विकास होईल.

Dada Kalamkar
Akola : अखेर अकोल्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा मुहूर्त निघाला; मात्र...

नगर (Nagar) शहरात व्यापार आणि औद्योगिक क्षेत्र शहरात कमी होत आहे. हे वेळीच रोखले नाही, तर शहर बकाल होईल." मी आणि अनिल राठोड 5 वेळा विधानसभा विरोधात लढलो. पण निवडणुका संपल्यावर मतभेद विसरून कायम एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत होतो. नगरपालिकेच्या माध्यमातूनही शहराच्या विकासासाठी अनेकदा भाजपला बरोबर घेतले.

पुलोदमधून आमदारकी लढताना भाजपने मोठी साथ दिली, म्हणूनच निवडून आलो. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्कारामुळे आनंद झाला आहे, असेही दादा कळमकर म्हणाले. नगर शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार दादा कळमकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दादा कळमकरांनी खंत व्यक्त करीत पुढील काळात नगर शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले. यावेळी भाजपचे माजी जिल्हध्यक्ष भानुदास बेरड, शहर-जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, सरचिटणीस सचिन पारखी उपस्थित होते. वसंत लोढा यांनी दादा कळमकर पुलोदमधून विधानसभा लढताना सर्वांनी एकमताने त्यांना पाठिंबा दिला होता.

लता लोढांनाही शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्यासाठी दादांनी मदत केली. मात्र शहरात ज्यांचे राजकारण संपल्यात जमा होते, अशांना दादांनी मदत करून आमदार केल्याने शहराचे खूप मोठे नुकसान झाले. त्याचे दूरगामी फळ नगरकर भोगत आहेत. त्यामुळे आगामी काळात शहराच्या भवितव्यासाठी दादांनी योग्य मार्गदर्शन करावे, असे म्हटले.

अभय आगरकर आणि भानुदास बेरड यांची यावेळी भाषणे झाली. सचिन पारखी, भाजपचे सरचिटणीस प्रशांत मुथा, महेश नामदे, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक आसाराम कावरे, बाळासाहेब खताडे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर बोचूघोळ, मुकुल गंधे, सुहास पाथरकर, अशोक गायकवाड, स्वप्निल बेद्रे, सोमनाथ चिंतामणी उपस्थित होते.

(Edited by Amol Sutar)

Dada Kalamkar
Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचा महालक्ष्मी रेसकोर्सप्रकरणी गंभीर आरोप, पण नेमके प्रकरण काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com