Nagar News : लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील नेते एकसंघपणे आपआपल्या मतदारसंघातील कामांबाबत सक्रिय झाल्याचे दिसते. राहुरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार लहू कानडे पिण्याच्या पाणी प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. भाजपचे युवा नेते विवैकभैय्या कोल्हे यांनी शेतकऱ्यांसाठी अर्ज क्रमांक सात आॅनलाईन स्वीकारण्याची मागणी केली.
निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू झाले आहे. 'टेल टू हेड', या पद्धतीने लाभक्षेत्रातील तलाव भरले जाणार असून हे आवर्तन नऊ ते दहा दिवस सुरू राहणार आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आवर्तनासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून दोन महिन्यापूर्वी पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली होती.
त्यानंतर काल उजव्या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर ते राहुरी तालुक्यातील निंभेरे, तुळापूर, कानडगाव , तांदुळनेर, वडनेर या भागापर्यंत पोहोचले. येथून बंद पाईपलाईन मधून कालवा केलेला आहे. त्यामुळे तसेच अन्य ओढ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लक्ष घातले. आमदार तनपुरे यांनी या भागातील कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याची पाहणी केली.
मुळा धरणाच्या डावा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी आमदार लहू कानडे यांनी केली होती. पाणी सोडण्यासाठी आमदार कानडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तीन दिवसांपासून मुळा धरणातून आवर्तन सोडण्यात आले. राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पाण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या देवळाली (ता. राहुरी) उपविभागीय कार्यालयाकडे लेखी पत्र देण्याच्या सूचना आमदार कानडे यांनी केल्या आहेत.
भाजपचे युवा नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आणि नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे शेतकरी पाण्यासाठी भरून देत असलेला अर्ज क्रमांक सात आॅनलाईन स्वीकारण्याची मागणी केली आहे. गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यांचे आर्युमान 119 वर्षाचे झालेले आहे. त्याच्या नुतनीकरणाची कामे सुरू आहे.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
ब्रिटीशकालीन कामे खिळखिळी झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक आर्वतन काळात कालवा फुटीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कालव्यांच्या नुतनीकरणाची कामे दर्जेदार करावीत. याशिवाय कालवा आर्वतनाच्या तारखा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर देण्याची मागणी विवेकभैय्या कोल्हे यांनी जलसंपदा विभाग आणि नाशिक पाटबंधारे खात्याकडे केली आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.