Lok Sabha Election 2024 : मतमोजणीसाठी 900 कर्मचाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यास...

Lok Sabha Election 2024 Voting : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चार जून होत आहे. यासाठीच्या नियुक्ती कर्मचारी आणि अधिकारी यांचे प्रशिक्षण 28 मे रोजी होत असून, गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे नगर जिल्हा प्रशासनाने सांगितले.
Lok Sabha Election
Lok Sabha Election sarkarnama
Published on
Updated on

Nagar News : लोकसभेच्या मतमोजणीसाठी (Lok Sabha Election 2024) नगर जिल्हा प्रशासनाने 900 कर्मचारी सज्ज केले आहेत. चार जूनला मतमोजणी होत आहे. नगर जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीत सहभागी होत असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना 28 मे रोजी प्रशिक्षण दिले जाणार आहे. नियुक्ती झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण अनिवार्य असून, गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाईचा इशारा नगर जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

नगर जिल्ह्यात शिर्डी (Shirdi) आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे. या दोन्ही मतदारसंघातील मतमोजणी नगर शहरात असलेल्या एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात होईल. शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा (Lok Sabha Elections) मतदारसंघातील मतमोजणीसाठी नियमित 786 आणि पोस्ट मतमोजणीसाठी 128 कर्मचारी असणार आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची नगर जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. 28 मे रोजी या कर्मचाऱ्यांना दोन सत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election
Bhaskar Bhagare Politics : निकालाआधीच राष्ट्रवादीच्या भास्कर भगरे यांच्यावर अपेक्षांचे ओझे !

ईव्हीएम मशीनवरील (EVM machine) मतमोजणीसाठी नगर आणि शिर्डीसाठी 102 पर्यवेक्षक असतील. त्यांना 208 मदतनीस असतील. यांच्याबरोबर 102 सूक्ष्म निरीक्षक राहतील. नगर जिल्ह्यात सुमारे दहा हजारपेक्षा जास्त पोस्टल मतदान आहे. या मतदानामध्ये लष्करात असलेल्यांची मतसंख्या जास्त आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सात हजार, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात अडीच हजार पेक्षा जास्त जवानांनी पोस्टलद्वारे मतदान केले आहे. याशिवाय 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्के दिव्यांगाना घरी बसून मतदान करता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून दिली होती. यांचे मतदान बॅलेट पेपरवर झाले आहे. Training of staff and officials by city district administration for vote counting

लष्करातील जवान, दिव्यांग आणि 85 वर्षांवरील मतदारांचे मतदान बॅलेट पेपरवर झाल्याने, या मतपत्रिकेंची संख्या जास्त आहे. यामुळे नगर दक्षिण मतदारसंघासाठी 17 पर्यवेक्षक, 34 मदतनीस आणि 17 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतपत्रिकांची संख्या कमी असल्याने तिथे 15 पर्यवेक्षक, 30 मदतनीस आणि 15 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Lok Sabha Election
Ahmednagar News : CM शिंदे, फडणवीसांंकडून गेल्यावर्षी नगरच्या नामांतराची घोषणा; यंदाच्या सोहळ्याकडे लक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com