Nagar Urban Bank
Nagar Urban BankSarkarnama

Nagar Urban Bank Scam : नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात एका माजी नगरसेवकासह दोघांना कोठडी; गांधी कुटुंबियांच्या अडचणी वाढणार ?

Nagar Urban Bank Scam : नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई केली.
Published on

Ahmednagar News: नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दोघांना अटक केली असून, त्यात भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे. भाजपचे माजी नगरसेवक तथा माजी संचालक मनेष साठे आणि नगर अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष अनिल कोठारी या दोघांना अटक केली.

या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, 2 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या कारवाईमुळे भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी आणि परिवाराभोवती अडचणी वाढल्या आहेत. फॉरेन्सिक ऑडिटनुसार 102 आरोपी असून, यात वाढ होण्याची शक्यता आहे. (Nagar Urban Bank Scam)

नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहाराचा आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या गैरव्यवहाराचे फॉरेन्सिक ऑडिट गुन्हे शाखा पोलिसांना प्राप्त झाले आहे. गैरव्यवहारात बँकेतील अधिकारी प्रदीप पाटील आणि राजेंद्र लुलिया यांना अटक करण्यात आली. आता हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील अधिकारी आणि काही संचालकांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यानतंर कोठारी आणि साठे यांना विशेष पथकाने ताब्यात घेतले होते.

यानंतर या दोघांकडे चौकशी करण्यात आली. यात दोघांची प्रकृती खालवल्याने त्यांना वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचारानंतर त्यांना काल उशिरा अटक करण्यात आली. या दोघांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nagar Urban Bank
Lok Sabha Election 2024 : 'नगर जिल्ह्यातही 'रामराज्य' येणार...'; राम शिंदे अन् लंकेंनी वाढवली सुजय विखेंची धडधड

सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी युक्तिवाद केला. कर्जदाराच्या खात्यातील पैसे यांच्या खात्यात आले आहेत. त्याचा तपास करायचा आहे. अफरातफरीमध्ये यांचा कोठे सहभाग आहे, हे देखील तपासून पाहायचे आहे. यानंतर कोठारी आणि साठेतर्फे वकील महेश तवले, संजय दुशिंग आणि संकेत ठाणगे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

फॉरेन्सिक ऑडिट झाले आहे. यात या दोघांकडे काहीच निष्पन्न झालेले नाही. कर्जदार आणि या दोघांचे परस्पर व्यवहार असू शकतात. तसेच दोन वर्षात या दोघांकडे चार वेळा चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत देखील काहीच निष्पन्न झालेले नाही, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्हीकडचा युक्तिवाद तपासून या कोठारी आणि साठे या दोघांना आठ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश केला आहे.

गैरव्यवहाराच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी

नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारात राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात एकत्रित गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीत दीडशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांकडे वर्ग केला होता. या गैरव्यवहाराच्या दाखल गुन्ह्यात पोलिसांनी अतिशय धिम्या गतीने कारवाई होत होती. अर्बन बॅंकेतील गैरव्यवहाराचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. यात 291 कोटी 25 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले.

विशेष तपास पथकाची स्थापना

नगर अर्बन सहकारी बँकेतील कर्ज गैरव्यवहार व आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. अतिरीक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत राहिल.

अर्बन बँकेतील गैरव्यवहारची व्याप्ती, आरोपींची वाढणारी संख्या, आर्थिक गुन्ह्याची क्लिष्टता या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी हा निर्णय घेतला आहे. या एसआयटी पथकात अतिरीक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याबरोबर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक हरीष खेडकर आणि दोन पोलिस निरीक्षक, पाच पोलिस अंमलदार यांचा समावेश आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Nagar Urban Bank
Vikhe Patil On Ajit Pawar: मंत्री विखेंनी वाढवली अजितदादांची धडधड; 70 हजार कोटींच्या घोटाळ्यावर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com