Maharashtra Congress : काँग्रेसच्या जम्बो कार्यकारिणीत श्रीरामपूरला 'लॉटरी' अन् 'मोठी जबाबदारी'

Shrirampur MLA Hemant Ogale, Karan Sasane, Deepali Sasane Appointed by Harshwardhan Sapkal in Congress : श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, करण ससाणे यांची प्रदेश सरचिटणीसपदी, दिपाली ससाणे यांची काँग्रेसच्या युवक राष्ट्रीय सचिवपदी वर्णी लागली आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress political : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकताच महाराष्ट्र प्रदेशसाठी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरला झुकते माप मिळालं.

जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघापैकी श्रीरामपूरनं काँग्रेसला आमदार दिला. यात महत्त्वाची भूमिका ठरलेल्या ससाणेंना काँग्रेसने झुकतं माप दिलं. तसंत ससाणे अन् ओगले यांची मैत्री देखील काँग्रेसनं जपली.

काँग्रेसच्या (Maharashtra) जम्बो कार्यकारिणीत, आमदार हेमंत ओगले आणि करण ससाणे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी, तर करण यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या दिपाली ससाणे यांची भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती जाहीर केली.

या तिन्ही निवडीची अधिकृत घोषणा अखिल भारतीय काँग्रेस (Congress) कमिटीचे महासचिव खासदार के. सी. वेणूगोपाल यांनी पत्रकाद्वारे केली. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील या नियुक्त्या संपूर्ण राज्यभरातून करण्यात आल्या आहे. ओगले-ससाणे यांसह एकूण 67 जणांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे.

Congress
Maharashtra Minister Viral Video : 'पगार कोण देतं, कानाखाली मारेल...'; कोकाटेंनंतर रोहित पवारांनी आणखी एका मंत्र्याचा व्हिडिओ दाखवला

अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरण पाहता ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेत जिल्ह्यातून 12 जागांवर निवडणूक झाली, त्यात केवळ श्रीरामपूरमधूनच काँग्रेसचे आमदार निवडून आले. बाकी सर्व ठिकाणी महायुतीला विजय मिळाला.

Congress
Anjali Damania: 'मला भाजप नेत्यांची वाजवायला सगळ्यात जास्त आवडलं असतं, पण…'; अंजली दमानियांचं खळबळजनक विधान

या पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले यांनी काँग्रेसचा गड राखून संघटनेवर विश्वास टिकवून दाखवला. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी त्यांना आता संघटनात्मक जबाबदारी बहाल केली आहे. ससाणे कुटुंबियांचा काँग्रेसशी पूर्वापार जवळचा संबंध राहिला आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी पक्षासाठी सातत्याने कार्य केले आहे.

काँग्रेस विचारधारेशी निष्ठा जपत त्यांनी संघटनात्मक बांधिलकी जोपासली. माजी आमदार (कै.) जयंत ससाणे हे करण ससाणे यांचे वडील असून, त्यांनी श्रीरामपूरातून दोनदा काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक जिंकली होती. तसेच शिर्डी संस्थानचे अध्यक्ष म्हणून त्यांचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक वरिष्ठ नेत्यांशी स्नेहसंबंध होते. या निवडीमुळे श्रीरामपूर काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीला नवे बळ मिळणार असून, येत्या काळात जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा प्रभावीपणे उभा राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com