Nagpur Hit and Run Case : ...तर त्याला दोषी कसं धरायचं? अजितदादांच्या नेत्याकडून बावनकुळेंच्या लेकाची पाठराखण

NCP Anil Patil On Nagpur Hit and Run Case : संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याच्या ऑडी कारने अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना समोर आल्यापासून राज्यातील राजकारण तापलं आहे. संकेतवर गुन्हा दाखल झाला नाही तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करू असा इशाराच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
NCP Anil Patil
NCP Anil PatilSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nagpur Hit and Run Case : "भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा (मुलगा संकेत बावनकुळे याची चूक नसेल तर त्याला दोषी कसं धरायचं? विरोधकांनी तो नेत्याचा मुलगा आहे म्हणून टार्गेट करणं चुकीचं आहे," असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील (Anil Patil) यांनी बावनकुळेंच्या मुलाची पाठराखण केली आहे.

नागपूरमध्ये संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) याच्या ऑडी कारने अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना समोर आली आणि तेव्हापासून राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाने या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

शिवाय संकेतवर गुन्हा दाखल झाला नाही तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करू असा इशाराच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिला आहे. अशातच आता नागपूर हिट अॅण्ड रन प्रकरणावर बोलताना अनिल पाटील यांनी संकेत बावकुळेला टार्गेट करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

पाटील म्हणाले, विरोधकांकडून नेत्याच्या मुलगा आहे म्हणून टार्गेट केलं जाणं हे चुकीचं आहे. अपघात झाला हे चुकीचं आणि दुर्दैवाचा आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा मुलगा असला तरी योग्य ती कारवाई केली पाहिजे, असं ते म्हणाले आहेत. गाडी देखील संकेत बावनकुळे यांच्या नावावर आहे.

NCP Anil Patil
Chandrashekhar Bawankule : महायुतीचे परफेक्शन बदलेल असे बोलू नका; बावनकुळेंनी दिला इशारा

मात्र त्यांची चूक नसेल तर त्यांना दोषी कसं धरायचं? पोलिसांनी निपक्षपणे चौकशी करावी ही शासनाची मागणी असून या प्रकरणाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये." पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता त्यांनी बावनकुळेंच्या लेकाची पाठराखण कल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, यावेळी त्यांना महायुतीच्या जागावाटपा संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जागावाटप ठरवण्याचा माझा अधिकार नाही. जागावाटप करण्याचे अधिकार तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा असून भविष्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री होणार असून तो पाच वर्षासाठी असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

NCP Anil Patil
Supriya Sule : आमदार गेले असले तरी संघटना साहेबांसोबतच, सुप्रिया सुळेंनी ठणकावले

शिंदेंच्या नेत्याकडूनही संकेतची पाठराखण

संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी ज्या हॉटेलमध्ये जेवण केलं, त्या हॉटेलच्या बिल मध्ये बीफचा समावेश असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. राऊतांच्या या वक्तव्यावर शिदें गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली.

"तो हॉटेलमध्ये काय खात होता आणि काय नाही हे त्यांना काय करायचं आहे. संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्या हॉटेलमध्ये काय होतं? त्यांच्या प्लेटमध्ये काय होतं? अहो त्यांनी कोणती चड्डी घातली हे पाहायला देखील तुम्ही कमी करणार नाही. यांना आपण कशावर चर्चा करतात हे तरी कळायला पाहिजे," असं म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली आणि संकेतची पाठराखण केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com