Nana Patole; महाराष्ट्राला लुटायचे अन् सुरतला वाटायचे हेच भाजपचे काम

छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या राज्य सरकारने महाराष्ट्राला लुटायचे काम केले
Congress Leader Nana Patole
Congress Leader Nana PatoleSarkarnama

नाशिक : राज्यातील (Maharashtra) सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपचे (BJP) सरकार हे महाराष्ट्राच्या हिताचे काम करीत नाही. त्यांना फक्त गुजरात (Gujrat) राज्याची काळजी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घेऊन सत्तेत यायचे मात्र, महाराष्ट्राला लुटायचे आणि सुरतला वाटायचे असे उलटे काम हे सरकार करीत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. (Patole Said, Present State Government is looting maharashtra & distributing to Surat (Gujrat)

Congress Leader Nana Patole
Congress News: नाना पटोले `पदवीधर`साठी काय कानमंत्र देणार?

श्री. पटोले नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सध्याचे केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार आणि त्यांच्या कामकाजावर त्यांनी शेलक्या भाषेत टिका केली.

Congress Leader Nana Patole
BJP News: गोंधळलेला भाजप सत्यजीत तांबेंना पाठींबा देण्याच्या मनस्थितीत?

विदर्भातील राखीव जंगलातील काही वाघ गुपचुप देण्यात आले आहेत. याशिवाय आणखी काही वाघ तसेच बिबटे गुजरातल्या देण्याचे काम गुपचुपपणे सुरु आहे. यावर श्री. पटोले म्हणाले, सध्या राज्य सरकार महाराष्ट्राची नव्हे तर गुजरातची काळजी घेत आहे. त्यांनी वाघ, बिबटे हे प्राणीही सोडले नाहीत. राज्याचे उद्योग, रोजगार, प्रकल्प सगळं ते गुजरातला देण्यात धन्यता मानत आहेत. त्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे त्यांचे काम सुरु आहे. त्याबाबत त्यांना जराही खंत, कमीपणा वाटत नाही, हे अतिशय खेदजनक आहे.

ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतच्या औरंगजेबाच्या व्यापाऱ्यांना लुटले व ती संपत्ती महाराष्ट्रातील गोरगरीब प्रजेला वाटली. त्यांचे कल्याण केले. मराठी रयतेच्या स्वराज्याच्या उभारणीसाठी काम केले. मात्र छत्रपतींचेच नाव घेऊन सत्तेवर आलेले सध्याचे राज्यातील भाजप व मुख्यमंत्री शिंदे यांचे सरकार त्याच्या उलट काम करीत आहे. त्यांनी सत्तेवर आल्यावर सांगता येईल असे राज्यासाठी काय केले आहे?. ते फक्त गुजरातची काळजी वाहतात. सामान्य जनतेला ते विसरले आहेत. ही स्थिती पाहून खेद वाटतो.

यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार लहु कानडे, नाशिकचे प्रभारी ब्रिजकिशोर दत्त, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, डॉ. तुषार शेवाळे, काँग्रेस प्रतोद डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे, ओबीसी आघाडीचे अध्यक्ष विजय राऊत, प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, माजी नगरसेवक राहुल दिवे, वसंत ठाकुर, वत्सलाताई खैरे, बबलु खैरे, माजी नगरसेविका आशाताई तडवी आदी उपस्थित होते.

आम्ही सर्व म्हणजे `काँग्रेस`

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूर आणि नाशिक मतदारसंघात उमेदवारीवरून झालेल्या गोंधळाबाबत त्यांनी स्पष्ट संदेश दिला. ते म्हणाले, आम्ही दोन्ही निर्णय प्राप्त परिस्थितीत धोरण म्हणून घेतले आहे. ते कोणी एकट्याने नव्हे तर पक्षाने घेतलेत. मी म्हणजे पक्ष नव्हे, आम्ही सर्व म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. याउपर कोणी पक्षाचे धोरण सोडून बंडखोर उमेदवारांना मदत किंवा सहानुभूती दाखवत असल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल हा माझा इशारा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com