Nandurbar illegal churches : नंदुरबारमध्ये 199 बेकायदा चर्च ! आदिवासी धर्मांतर चौकशीचे बावनकुळेंचे आदेश

Chandrashekhar Bawankule orders high-level probe into 199 illegal churches in Nandurbar over tribal conversions concerns : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात 199 बेकायदा चर्च आहेत. यातून स्थानिक आदिवासींचे धर्मांतर होत असल्याचा प्रश्न लक्षवेधू सूचनेतून धुळ्याचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केला.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात 199 बेकायदा चर्च आहेत. यातून स्थानिक आदिवासींचे धर्मांतर होत असल्याचा प्रश्न लक्षवेधू सूचनेतून धुळ्याचे भाजप आमदार अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केला. यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार अतुल भातखळकर, संजय कुटे, गोपीचंद पडळकर यांनीही राज्यात अद्याप धर्मांतरबंदी कायदा लागू नसल्याचे सांगितले. हा कायदा कधीपर्यंत लागू होईल असा प्रश्न त्यांनी केला. तातडीने कायदा करण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला.

त्यानंतर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना नंदुरबार जिल्ह्यातील अनधिकृत चर्च बांधकामे आणि आदिवासींच्या धर्मांतराच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत केली.जिल्ह्यातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांचे सहा महिन्यांत सर्वेक्षण केले जाईल व सर्व अनधिकृत चर्च तातडीने पाडले जातील असे आश्वासन त्यांनी दिले. राज्य सरकार आदिवासींच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीचे संरक्षण करण्याकरता कटिबद्ध असल्याचे बावनकुळे म्हणाले. राज्यातील सर्व आदिवासी आमदारांची समीती गठीत केली जाईल असं त्यांनी सांगितलं.

5 मे 2011 आणि 7 मे 2018 रोजी च्या शासन आदेशांनुसार परवानगीशिवाय बांधलेली चर्च काढून टाकली जातील. या संदर्भात धर्मांतराच्या वाढत्या घटनांवरही गांभीर्याने लक्ष देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कठोर कायद्याचा अभ्यास केला जाईल. अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली. यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून सहा महिन्यांत सर्व अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण पूर्ण होईल. अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि नियमांचे पालन करून कारवाई केली जाईल, असेही बावनकुळेंनी जाहीर केले.

Chandrashekhar Bawankule
Uddhav Thackrey Politics: शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांची नवी रणनीती, आता थेट...

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नवापूर तालुक्यात ख्रिस्ती मिशनरी आणि धर्मांतरित व्यक्तींकडून प्रलोभने तसेच आमिष दाखवून आदिवासी, बिगर-आदिवासींचे धर्मांतर केले जात असल्याचा आरोप केला. या धर्मांतरामुळे आदिवासींची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख धोक्यात येत आहे. तसेच गावठाण आणि शासकीय जागांवर ग्रामपंचायत, गृह विभागाची परवानगी न घेता 150 हून अधिक अनधिकृत चर्च बांधकामे झाली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Chandrashekhar Bawankule
Teachers Politics: शिक्षकांच्या एकजुटीच्या दबावामुळेच राज्य सरकार झुकले, दिलीप खोडपे यांचा दावा!

दरम्यान देशात हिंदूंची संख्या घटल्याची आकडेवारी सुधीर मुनगंटीवार यांनी वाचून दाखवली. ते म्हणाले बेकायदा चर्च उभारण्यासाठी विदेशातून पैसा येतो. मागच्या वर्षी 1515 संस्थांना विदेशातून पैसा आला. धर्मांतरावर कारवाईची जबाबदारी गृह विभागाला दिली आहे. मात्र, पोलिसांवर कामाचा ताण असतो. त्यामुळे कारवाई होत नाही. त्यासाठी विशेष विंग तयार करणार का असा सवाल आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com