Nandurbar Politics: गुजरात पोलिसांच्या कारवाईवर विरोधांचे भाजपला आव्हान, ‘लक्षात ठेवा, कॅप्टन जरी आत असला तरी कोच बाहेर आहे’

Nandurbar-BJP-Gujrat-Police-Arrest-Municipal-Election-President-Candidate-Vishwas-Badoge-Vikas-Aghadi-Sharad-Gavit-Accused-BJP-नवापूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारालाच अटक केल्याने विरोधकांचे भाजपला थेट आव्हान
Navapur Election
Navapur ElectionSarkarnama
Published on
Updated on

Gujarat Police News: महाराष्ट्राच्या नगरपालिका निवडणुकीत थेट गुजरात पोलिसांची एन्ट्री झाली आहे. नवापूर येथून भाजप विरोधात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला पोलिसांनी अटक केली. गुजरात पोलिसांच्या या कारवाईचे टाइमिंग चर्चेत आहे.

नवापूर नगरपालिका निवडणुकीचे राजकारण तापले आहे. भाजपच्या माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपच्या उमेदवाराविरोधात जिल्हा विकास आघाडीचे विश्वास बडोगे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.

नगरपालिका निवडणूक आजच्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस आणि इतर असा संघर्ष वेगळ्याच राजकीय वळणावर पोहोचला. अवैध मद्य तस्करी प्रकरणी गुजरात पोलिसांनी या निवडणुकीत एन्ट्री केली.

Navapur Election
Nandurbar News: ऐन निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला उचललं; गुजरात पोलिसांची महाराष्ट्रात घुसून कारवाई

गुजरात पोलिसांनी संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत ही कारवाई केली. याप्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात पाच गुन्हा दाखल आहे. त्यात गढरी टोळीचे २८ जण आधीच अटक करण्यात आले आहेत.

Navapur Election
Eknath Shinde Politics: शिंदेंची शिवसेना झाली सावध, भाजप विरोधात दादा भुसे यांना बाजूला करीत घेतला मोठा निर्णय!

निवडणुकीचा प्रचार जोमात असतानाच ही कारवाई झाली. विशेष म्हणजे म्हणजे ही कारवाई गांधीनगर पोलिसांनी केली. श्री बडोगे यांना त्यांच्या राहत्या घरातून नवापूर येथून अटक करण्यात आली. याविषयी स्थानिक पोलिसांना माहिती नव्हती. ही अटक नवापूर येथून केली असताना त्याची नोंद मात्र भडभुंजा पोलीस ठाण्यात दाखविण्यात आली आहे.

या कारवाईनंतर जिल्हा विकास आघाडीचे नेते चांगलेच संतापले आहेत. हे सत्ताधारी पक्षाचे ष़डयंत्र आहे. पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांनी सत्तेचा दुरूपयोग सुरू केला आहे. मात्र त्याचा मतदार व आघाडीच्या उमेदवारांवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

यासंदर्भात आघाडीचे नेते माजी आमदार शरद गावीत भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. पालिका निवडणुकीत जिल्हा विकास आघाडीच्या उमेदवारांचे मनोबल तोडण्यासाठीच ही कारवाई झाली. हे राजकीय षडयंत्र आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा दावा त्यांनी केला.

माजी आमदार शरद गावीत यांनी, आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वास बडोगे राजकीय षडयंत्राचे बळी ठरले. प्रचारात आघाडी घेतल्यानेच सत्ताधाऱ्यांनी हा रडीचा डाव खेळला. आमचा कॅप्टन जरी आत असला तरी कोच बाहेर आहे. आम्ही सर्व शक्तीनिशी त्या विरोधात लढा देऊ, असे माजी आमदार गावित म्हणाले.

नवापूर नगरपालिका निवडणुकीचे राजकारण आता तापले आहे. भाजप आणि त्यांच्या विरोधात जिल्हा विकास आघाडीने प्रचाराचे रान उठविले आहे. असे असतानाच त्यात गुजरात पोलिसांची एन्ट्री झाली. गुजरात पोलिसांच्या कारवाईचे टाइमिंग चर्चेत आले आहे. याबाबत विरोधकांनी गंभीर आक्षेप नोंदविले आहेत.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com