Shivsena Vs BJP News: भाजपच्या आक्रमक निवडणूक रणनीतीला उत्तर देण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष पुढे सरसावला आहे. त्यासाठी नाशिकच्या रणनीतीत मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महायुतीतच रणधुमाळी रंगण्याची चिन्हे आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आव्हान दिले आहे. भाजप हा आपला मुख्य प्रतिस्पर्धी असल्याची जाणीव या निमित्ताने पक्षाला झाली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या रणनीतीतही बदल करण्यात आला आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. मात्र निवडणुका तोंडावर आल्या असतानाही फारशा गतिमान हालचाली नव्हत्या. याची आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे.
नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेना शिंदे पक्षाने केली आहे. यासाठी पक्षाने मतदारयाद्यांचा अभ्यास केला आहे. भाजपच्या रणनीतीप्रमाणेच स्वतंत्र वॉर रूम तयार करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे शिवसेनेचे मुख्य टार्गेट असेल
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिक्षण मंत्री भुसे हे मुख्य होते. आता त्यांना बाजूला करण्यात आले आहे. नांदगाव चे आमदार सुहास कांदे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजप विरोधात आक्रमक धोरण राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते स्थानिक कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे पुढील आठवड्यात नाशिकचा दौरा करण्याची शक्यता आहे. भाजपला युतीसाठी जागांचा ठोस प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्याला तातडीने प्रतिसाद न मिळाल्यास शिवसेना आपला मार्ग निश्चित करेल.
भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटस मुळे शिवसेना शिंदे पक्षात अस्वस्थता आहे. नगरपालिका निवडणूक प्रचारात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जव्हार येथे मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांना थेट आव्हान दिले होते. त्यामुळे आगामी राजकारणाची चाहूल महायुतीच्या प्रत्येक गटक पक्षाला लागली आहे. त्यामुळेच नाशिकचे पदाधिकारी महापालिका निवडणुकीसाठी अधिक सजग झाले आहेत.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.