

Nandurbar News: राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं जोरदार वारं सुरू आहे. या निवडणुकीत भाजपसह महायुतीनं पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे स्थानिक पातळ्यांवरील राजकीय आघाडी युती यांनी विरोधकांसह मित्रपक्षांनाच एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. पण याचदरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगरपालिकेतच्या निवडणुकीतून खळबळजनक बाब समोर आली आहे.
गुजरात (Gujrat) पोलिसांच्या विशेष पथकानं नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारालाच अटक केली आहे. अटक केलेल्या अपक्ष उमेदवाराचं नाव विश्वास बडोगे असं आहे. त्यांच्या अटकेमुळे नवापूर नगरपालिकेत एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा विकास आघाडीतर्फे विश्वास बडोगे यांनी नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल करत पूर्ण पॅनल निवडणूक मैदानात उतरवलं आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणि उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा विकास आघाडीतर्फे अपक्ष लढणाऱ्या विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी (Police) अटक बेड्या ठोकल्या आहेत. बडोगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर दहशतवाद आणि संघटीत गुन्हे नियंत्रण कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
गुजरात पोलिसांच्या गांधीनगर पोलिस पथकाने विश्वास बडोगे यांना गुरुवारी (ता.20) अटक केली आहे. पण पोलिसांच्या या कारवाईची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीतून नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी बडोगे यांच्यावर प्रचंड दबाव होता. मात्र, अर्ज मागे घेण्यासाठी नकार दिल्यानेच बडोगे यांना अटक करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे विश्वास बडोगे यांना पोलिसांनी नवापूर येथील त्यांच्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले असताना अटक मात्र गुजरातमधील भडभुंजा येथे दाखवली आहे. याचमुळे पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित केली जात आहे. बडोगे यांच्यावर करण्यात आलेली पोलिसांची कारवाई सूडबुध्दीने केल्याचा आरोप माजी आमदार शरद गावित यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांवर केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पालिकेसाठी अजित पवार यांच्या भाजपाकडून अभिलाषा वसावे पाटील, काँग्रेसने दिपचंद जयस्वाल तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत जाधव यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्य़ात आली आहे. तर जिल्हा विकास आघाडीच्यावतीनं विश्वास बडोगे यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
जामनेरमधील एक व्हिडिओ शुक्रवारी (ता.22) व्हायरल झाला आहे. त्यात काही कार्यकर्ते एका उमेदवाराला कॉलरला पकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर नेतात आणि अर्ज मागे घ्यायला लावतात. हे कार्यकर्ते भाजपचे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गौरव दिलीप खोडपे यांनी केला आहे. जामनेर नगरपरिषदेतही 9 जागांवरील उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. पण हे अर्ज मागे घेताना भाजपकडून प्रचंड दडपशाही झाल्याचा आरोप खोडपे म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.