
Nandurbar Congress : उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचे कॉंग्रेससोबत एक अतूट नाते राहिलेले आहे. नंदुरबार जिल्हा हा कॉंग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. कॉंग्रेसने अनेक नव्या धोरणांची सुरुवात नंदुरबारमधूनच केली. लोकसभेच्या प्रचाराचा नारळही गांधी परिवार नंदुरबारमधूनच फोडायचा. १९५२ पासून ते २०१४ पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे. मात्र एकेकाळी बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच नंदुरबार जिल्ह्याची अवस्था वाईट झाली आहे.
गेली सहा वर्ष झाली कॉंग्रेसला नंदुरबार जिल्ह्यात साधा जिल्हाध्यक्ष मिळालेला नाही. कार्याध्यक्ष आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष यांच्यावरच सध्या पक्षाचे काम सुरू आहे. जिल्हाध्यक्ष नसल्याने प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार शिरीषकुमार नाईक यांच्यावर जबाबदारी आहे. मात्र संघटनात्मक पातळीवर विशेष कामगिरी दिसून येत नाही. काँग्रेसमध्ये अनेक चांगले नेते व कार्यकर्ते आहेत मात्र जिल्हाध्यक्ष नसल्याने त्यांच्यात मरगळ आल्याचे चित्र दिसत आहे.
नंदुरबारच्या आदिवासी बहुल पट्ट्यातील जनतेच्या मनात गांधी परवाराविषयी वेगळी आस्था राहिली आहे. राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये राजकारणामध्ये प्रवेश करताना नंदुरबारमध्ये पहिली सभा घेतली होती. अनेक योजनांची सुरुवात त्यांनी नंदुरबारमधून केली. गांधी परिवाराचे नंदुरबारमधील नेत्यांशी अत्यंत जिवाळ्याचे संबध राहिले आहेत.
राहुल गांधी यांनीही आपल्या भारत जोडो यात्रेची सुरुवात येथूनच केली होती. लोकसभेच्या वेळेलाही प्रियंका गांधीच्या सभेला नंदुरबारच्या जनतेने दिलेल्या प्रतिसादातून ते दिसून आलं. मात्र त्याच नंदुरबारमध्ये सध्याच्या घडीला काँग्रेसचा एक खासदार तर एक आमदार आहे.
सध्या शिवसेनेत असलेले आमदार चंद्रकांत रघुवंशी एकेकाळी कॉंग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष पदावर होते. २०१९ मध्ये त्यांनी कॉंग्रेस सोडली. तेव्हापासून आतापर्यंत सहा वर्ष झाली नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाने अद्याप जिल्हाध्यक्षांची निवड केलेली नाही. कार्याध्यक्ष आणि प्रभारी जिल्हाध्यक्ष यांच्यावरच सध्या पक्षाचे काम सुरू आहे. असे असताना सामान्य कार्यकर्त्यांची मात्र त्वरित जिल्हाध्यक्ष निवडावा अशी अपेक्षा आहे.
जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यात अनेक कार्यकर्ते व नेते इच्छुक आहेत. मात्र तरीही कॉंग्रेसपक्षामध्ये असलेल्या गटबाजीमुळे अद्याप जिल्हाध्यक्ष नेमता आलेला नाही हेही वास्तव आहे. कारण कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी तसे प्रयत्नही केले होते. मात्र पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे ते होऊ शकले नाही. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता जिल्हाध्यक्ष नेमावा अशी सर्वसामन्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.