BJP Vs Congress News : नंदुरबार मतदार संघात सामान्यतः आदिवासी मतदार सकाळी लवकर मतदान करतात. यंदाच्या मतदानातही तोच ट्रेंड दिसून आला. हे प्रमाण एरव्हीपेक्षा वाढले आहे. त्यामुळे या मतदारसंघात यंदा चुरशीचे वातावरण दिसते आहे.
नंदुरबार मतदारसंघात आज सकाळपासूनच मतदानासाठी लांब रांगा दिसून आल्या. अनेक मतदान केंद्रांवर कार्यकर्ते आणि मतदारांची गर्दी दिसून आली. दुर्गम भागातील मतदारांना विशेष प्रयत्न करून कार्यकर्ते मतदान केंद्रावर आणत होते. पाड्यांवरही तीच स्थिती होती. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानासाठी चढाओढ दिसली.
दुपारी एकपर्यंत नवापूर विधानसभा मतदारसंघात ४५ टक्के मतदान झाले होते. हा मतदारसंघ काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांचा आहे. मात्र, येथे भाजप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये मोठी राजकीय चढाओढ राहिली आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित आणि मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू माजी आमदार शरद गावित यांचे हे कार्यक्षेत्र आहे. हे दोन्ही नेते सध्या भाजपमध्ये आहेत.
त्यामुळे भाजपने येथे काँग्रेस पेक्षा वरचढ रसद उपलब्ध केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याचा प्रभाव मतदानावर झाल्याचे बोलले जाते. एकंदर मतदार संघात निवडणूक निर्णय विभागाने जाहीर केल्यानुसार दुपारी एक वाजेपर्यंत ३७.३३ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी आणि विद्यमान खासदार डॉ हिना गावित यांच्यात जोरदार चुरस दिसून येते.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी यांनी भाजपसाठी तसेच प्रियंका गांधी यांनी काँग्रेसच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतली होती. त्यामुळे मतदारसंघात उत्साह वाढल्याचे बोलले जाते. मतदारसंघात अधिक मतदान होण्याचा प्रघात आहे. गत निवडणुकीत ६८.८८ टक्के मतदान झाले होते. यंदाही आकडेवारी ७० टक्के होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मतदारांमध्ये शासकीय यंत्रणा आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून जागृती करण्यात आली आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.