BJP Vs NCP: तळेगावमध्ये 'बिनविरोध'चा महायुतीचा प्लॅन फसला; भाजप–राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Talegaon Dabhade Nagar Parishad Election : तळेगाव नगरपरिषदेची निवडणूक बिनविरोध नाही तर उलट अपक्षांच्या बंडामुळे ती अधिकच रंगतदार होणार आहे. भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीची समीकरणं अचूक ठरली असली तरी बिनविरोध निवडणूक घडवून आणण्याचा महायुतीचा प्लॅन मात्र अपक्षांच्या बंडखोरीमुळे हाणून पडला आहे.
Talegaon Dabhade Nagar Parishad  .jpg
Talegaon Dabhade Nagar Parishad .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महायुतीत मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत अधिकृत युती असली तरी कार्यकर्त्यांमधील धुसफूस अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी उघड झाली असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे.

अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू असताना तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) नगरपालिकेच्या इमारतीत कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली आहे.एकमेकांना धरून खेचण्याचा प्रकार घडला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी तळेगाव पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून वातावरण निवळले. आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळे केले.

नगरपरिषदेच्या एकूण 34 पैकी 19 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 तर भाजपचे 9 उमेदवार आहेत. उर्वरित 15 जागांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

महायुतीतील दबलेला असंतोष अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या प्रकाराने पुन्हा उफाळून आला असल्याचे बोलले जात आहे. युती असली तरी उमेदवारी वाटप, प्रभागांची विभागणी आणि स्थानिक पातळीवरील जुना वाद यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याचे सांगितले जाते.

Talegaon Dabhade Nagar Parishad  .jpg
Congress Political Crisis: बिहारमध्ये धुव्वा उडाल्यानंतर काँग्रेस समोर मोठं संकट, इंडिया आघाडीत फूट? 'हे' पक्ष बाहेर पडणार

19 जागा जरी बिनविरोध आल्या असल्या तरी उर्वरित 15 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे हा वाद या निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तळेगाव नगरपरिषदेची निवडणूक बिनविरोध नाही तर उलट अपक्षांच्या बंडामुळे ती अधिकच रंगतदार होणार आहे. भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीचा समीकरणं अचूक ठरली असली तरी बिनविरोध निवडणूक घडवून आणण्याचा महायुतीचा प्लॅन मात्र अपक्षांच्या बंडखोरीमुळे हाणून पडला आहे.

Talegaon Dabhade Nagar Parishad  .jpg
Vaibhav Naik : राजकोट पुतळा दुर्घटना : निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा! वैभव नाईकांची निर्दोष मुक्तता

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. अनेक प्रभागांत अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढल्याने युतीचा ‘फिट प्लॅन’ बिनविरोध निवडणुकीच्या स्वप्नावर पाणी फिरले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com