Heena Gavit : ऐन मतदानादिवशी हिना गावीत यांचा मोबाईल हॅक; काँग्रेसवर गंभीर आरोप

Nandurbar Lok Sabha Constituency : आपला मोबाईल हॅक झाल्याचा प्रकार हिना गावित यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडिओ पोस्ट करुन दिली आहे.
Heena Gavit
Heena GavitSarkarnama

Nandurbar Political News : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ११ मतदारसंघासाठी मतदान पार पडले. यात नंदुरबार लोकसभेचाही समावेश होता. मतदानाच्या ऐन दिवशी भाजप उमेदवार डॉ. हिना गावीत यांचा मोबाईल हॅक झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर गावीत यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे नंदुरबारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार हिना गावित Heena Gavit यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यास पोलिस अधीक्षकांचानीही दुजोरा दिला आहे. मोबाईल हॅक करून काँग्रेसकडून अपप्रचार केला जात असल्याचा आरोप हिना गावित यांनी केला आहे. काँग्रेसला पराभव दिसत असल्यामुळे अशा पद्धतीचा अपप्रचार केला जात असल्याची टीका गावित यांनी केली आहे.

आपला मोबाईल हॅक झाल्याचा प्रकार हिना गावित यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडिओ पोस्ट करुन दिली आहे. या माध्यमातून त्यांनी मतदारांना घडल्या प्रकाराची माहिती दिली आहे. मतदारांनी दक्ष रहावे, असा कुठलाही कॉलवर विश्वास ठेवू नये, असे आवहानही गावित यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Heena Gavit
Sarkarnama Exclusive : मुरलीधर मोहोळांचा गेम करून धंगेकरांना ‘नाना’ तऱ्हेने सेफ करणारा नेता कोण?

नंदुरबार Nandurbar लोकसभा मतदारसंघात भाजपच्या हिना गावीत यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते के.सी. पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी Gowal Padwi लढत आहेत. या मतदारसंघात एकूण ६१.२६ टक्के मतदान झाले. यातील अक्कलकुवा ५६.४०, नंदुरबार ५८.५३, नवापूर ५८.८४, साक्री ६३.९३, शहादा ६३.४६ तर शिरपूर विधानसभेत ५५.९८ टक्के मतदान झाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Heena Gavit
Udayanraje News : होऊ दे खर्च ! लोकसभेत उदयनराजेंचा सर्वाधिक तर बिचुकलेंचा किती?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com