Nandurbar Lok Sabha News : काँग्रेस उमेदवाराच्या अर्जावर भाजपचा आक्षेप; अर्जात माहिती लपवल्याचा आरोप...

Lok Sabha Election 2024 : राज्य निवडणूक आयोगाकडे सुनावणी केली जाणार असून, आम्ही कोर्टात जाणार असल्याच्या डॉ. हीना गावित यांनी सांगितलं.
Nandurbar Lok Sabha News
Nandurbar Lok Sabha NewsSarkarnama

Nandurbar News : नंदूरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपचे आक्षेप घेतला होता. काँग्रेस उमेदवाराने माहिती लपवली असल्याचा आरोप भाजप खासदार डॉ. हीना गावित यांनी केला. लोकसभा निवडणुकीची आज उमेदवारी अर्ज छाननी असल्यामुळे छाननीसाठी सर्वच उमेदवार आले होते. या वेळी हीना गावित यांनी गोवाल पाडवी यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्याने हा मुद्दा चर्चेचा विषय झाला होता. (Lok Sabha Election 2024)

गोवाल पाडवी, के. सी. पाडवी आणि हेमलता पाडवी हे तिघी एकमेकांवर अवलंबून आहेत, असं या उमेदवारी अर्जात नमूद करण्यात आलं असल्याने भाजपा उमेदवार हीना गावित यांनी आक्षेप घेतला आहे. परंतु हा विषय स्थानिक नसल्याने यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे सुनावणी केली जाणार असून, आम्ही कोर्टात जाणार असल्याच्या डॉ. हीना गावित यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nandurbar Lok Sabha News
Nandurbar Lok Sabha News : हिना गावित करणार शक्तिप्रदर्शन; अर्ज भरताना कोण राहणार उपस्थित?

यावर काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी म्हणाले, "भाजप उमेदवार हीना गावित (Hina Gavit) यांनी केलेले आरोप खोटे आहेत. हा विषय छाननीच्या होता, परंतु तरीदेखील हीना गावित यांनी हा विषय घेतला मात्र निवडणूक निर्णय अधिकारी निकाल सर्वांच्या बाजूने दिला असून, सर्वे अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहेत.

Nandurbar Lok Sabha News
BJP Candidate Sarvesh Singh Dies : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी दु:खद बातमी; लोकसभा उमेदवाराचं निधन...
Nandurbar Lok Sabha News
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

यावर काँग्रेस (Congress) उमेदवार गोवाल पाडवी म्हणाले, "भाजप उमेदवार हीना गावित यांनी केलेले आरोप खोटे आहेत. हा विषय छाननीच्या होता, परंतु तरीदेखील हीना गावित यांनी हा विषयाला लक्ष्य केले, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी निकाल सर्वांच्या बाजूने दिला असून, सर्व अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहेत.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com