Nandurbar Lok Sabha : भाजपच्या हक्काच्या मतदारसंघावर शिवसेना आमदाराने ठोकला दावा, म्हणे एकनाथ शिंदेंचा आदेश आहे, लढणारच...

Amshya Padvi, Nandurbar Lok Sabha Election : नंदुरबारमध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. भाजपकडे असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या आमदाराने दावा ठोकत निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
Amshya Padvi, Nandurbar Lok Sabha
Amshya Padvi On Nandurbar Lok SabhaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nandurbar Lok Sabha Election : महायुतीच्या जागावाटपात नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला येतो. मात्र, भाजपच्या या हक्काच्या मतदारसंघावर आता शिवसेनेने दावा सांगितला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी या मतदारसंघातून खासदारकी लढण्याचे कार्यकर्त्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा सांगत, मी निवडणूक लढणारच, माघार घेणार नाही अशी भूमिका आमश्या पाडवी यांनी स्पष्ट केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासंदर्भात आपल्याला एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंचा आदेश असल्याचे सूचक विधान आमदार पाडवींनी केले आहे.

आमदार पाडवींनी भाजपच्या हिना गावितांवर थेट निशाणा साधत त्यांच्यावर निवडणुकीत गद्दारीचे आरोप केले आहेत. 2019 च्या निवडणुकीतील अवघ्या 1200 मतांच्या पराभवाचा दाखला देत आपल्यासोबत त्यावेळी गद्दारी झाल्याचा आरोप त्यांनी केला.

आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यानंतर आता आमदार आमश्या पाडवी यांनी देखील हिना गावित यांच्याविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये आगामी काळात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Amshya Padvi, Nandurbar Lok Sabha
Dada Bhuse Nashik : अभिजित दिपके पाहणी करण्याआधीच दादा भुसे पोहोचले ; नाशिकच्या बंद शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार हिना गावित यांचा पराभव झाला. हा पराभव शिवसेनेचे नेते, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यामुळे झाला असल्याचा आरोप गावित समर्थकांनी केला होता. त्यानंतर काही दिवसांनी स्वत:रघुवंशी यांनी देखील त्याची कबुली दिली होती. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला साथ दिल्याचे त्यांनी कबुल केले होते. तेव्हाच भाजप व शिवसेनेत अलबेल नसल्याचे चित्र उघड झाले होते.

त्यामुळे नंदुरबारमध्ये गावित विरुद्ध रघुवंशी असे राजकीय वैर असताना आता त्यात आमश्या पाडवी यांनी देखील गावित यांच्या विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतल्याने आगामी काळात काँग्रेसच्या वर्चस्वाखालील नंदुरबार मतदारसंघात भाजपला डावलून शिंदे सेना शड्डू ठोकण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

Amshya Padvi, Nandurbar Lok Sabha
Farmer Loan Waiver : शेतकऱ्याने आयुष्य संपवल्यास बँकाना जबाबदार धरणार, महसूलमंत्री बावनकुळे यांचा इशारा ; कर्जवसुलीसाठी तगादा न लावण्याच्या सूचना

दरम्यान शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमश्या पाडवी यांची भाजपच्या विरोधातील आक्रमक भूमिका पाहाता नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना-भाजप वाद चव्हाट्यावर आला असून आगामी काळात नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीत जागा वाटपावरुन वाद होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com