Nandurbar Politics : नंदुरबार का किंग कौन? गावित विरुद्ध सगळे अशीच लढत; चंद्रकांत रघुवंशी उतरले रणांगणात!

Nandurbar Nagar Panchayat Election Vijaykumar Gavit : नंदुरबार जिल्ह्यात सर्व नगरपालिकांमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे. महायुतीच्या घटक पक्षांना शेवटपर्यंत तिष्ठत ठेवण्यात आले. मात्र भाजपने युतीसाठी टाळी दिलीच नाही. त्यामुळे भाजप विरुद्ध सगळे लढत होण्याची शक्यता आहे.
Dr. Vijaykumar Gavit
Dr. Vijaykumar GavitSarkarnama
Published on
Updated on

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात चारही नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप स्वबळावर निवडणूक लढणार आहे. माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी हा राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न केला. त्यामुळे महायुती प्रत्यक्षात आलीच नाही.

शिवसेना शिंदे पक्षाकडून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निवडणुकीची मोर्चे बांधणी केली. त्यात प्रामुख्याने भाजपचे माजी मंत्री डॉ गावित यांच्या विरोधकांना एकत्र केले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांना मनापासून एकत्र यायचे होते का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची नंदुरबारच्या निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती झाली. पक्षाचे प्रदेश सचिव विजय चौधरी यांनी राजकीय वाटाघाटीसाठी प्रयत्न केले. मात्र यामध्ये मुख्य भूमिका जिल्ह्याचे नेते माजी मंत्री डॉ गावित आणि माजी खासदार डॉ हिना गावित यांचीच राहील.

आमदार रघुवंशी यांनी डॉ. गावित यांच्याकडे सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास युतीची तयारी दाखविली होती. प्रत्यक्षात मात्र भाजप स्वबळावर निवडणूक करणार हे माजी मंत्री डॉ गावित यांनी आधीच जाहीर केले होते. त्यांनी हे मनसुबे तडीस नेले आहेत.

शिंदेंच्या शिवसेनाही गाफिल न राहता जमवा जमव करत होती. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजपचे डॉ. विक्रांत मोरे यांना देखील आमदार रघुवंशी यांनी आपल्या गोठात सामील केले होते. नवापूरला भरत गावित यांनी आपली ताकद लावली आहे.

Dr. Vijaykumar Gavit
Vote Rigging : मतदानात हेराफेरी, 'CID'कडून एकाला अटक; राहुल गांधींनी आरोप केलेल्या मतदारसंघात काय घडलं?

या सर्व घडामोडी जिल्ह्याच्या राजकारणामुळे शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. नंदुरबारचे राजकारणात माजी मंत्री डॉ गावित यांनी प्रदीर्घकाळ आपले वर्चस्व ठेवले आहे. त्यात त्यांनी सर्वच विरोधकांना वेळोवेळी डिवचले होते. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीतही गावित विरुद्ध अन्य सर्व हे चित्र अपेक्षित होते. आता ते प्रत्यक्षात आले आहे. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस मात्र चाचपडताना दिसत आहे.

Dr. Vijaykumar Gavit
Bihar Election Result : "फक्त 'एकच' गोष्ट करा, बिहारनंतर नेपाळमध्येही BJP सरकार येईल"; स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरची बोचरी टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com