Shivsena- BJP : शिंदेंचे दोन आमदार माझ्या टार्गेटवर, त्यांची मस्ती जिरवायची आहे', भाजप आमदाराचा खुलेआम इशारा

BJP MLA Vijaykumar Gavit challenges Shiv Sena MLAs : 'शिंदे गटाच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे’ असं डॉ. विजयकुमार गावित म्हणाले. नंदुरबार जिल्ह्यात भाजप व शिवसेनेमधील वाद अधिकच विकोपाला गेला आहे.
Vijaykumar Gavit,
Eknath Shinde
Vijaykumar Gavit, Eknath Shinde
Published on
Updated on

Nandurbar Politics : नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिंदे गटातील दोन जण माझ्या टार्गेटवर असून त्यांना जास्त मस्ती आली आहे. त्यांची मस्ती मी जिरवणार आहे, या भाषेत भाजप आमदार विजयकुमार गावित यांनी इशारा दिला आहे.

गावित म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत, एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरा आमदार आमश्या पाडवी. या दोघांना जास्त मस्ती आली असून आपण ती जिरवणार आहोत असं गावित यांनी म्हटल्यानं नंदुरबार मधील शिवसेना व भाजप मधील वाद विकोपाला गेल्याचे दिसून आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचं गावितांनी स्पष्ट केलं आहे. गावित यांनी शिवसेना (शिंदे गट) आमदार आमश्या पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांना थेट आव्हान दिलं. आमश्या पाडवी यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. आमश्या पाडवी यांच्या नावावर बारा बंगले आहेत, तर त्यांच्या पत्नीकडे चार बंगले आहेत, तरी देखील पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभ घेतला आहे. तसेच पाडवी यांनी बायको आणि मुलाच्या नावावर शबरी आणि पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे असाही आरोप आमदार डॉ. गावित यांनी केला आहे.

गावितांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. महायुतीमधील स्थानिक नेत्यांच्या वागणुकीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यासंदर्भात पक्षातील वरिष्ठ नेत्यांना माहिती दिल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही पक्षाच्या वाढीसाठी आमची ताकद वापरतो. कोणत्याही दबावाला बळी न पडता कार्यकर्त्यांच्या साथीने आम्ही स्वबळावर पुढे जाऊ असं गावितांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित यावर प्रत्युत्तर दिलं आहे. गावित हे भाजप पेक्षाही स्वत:ची सेना वाढवण्याच्या प्रयत्नात असून ते स्वत:च पक्ष संपवत असल्याची टीका रघुवंशी यांनी केली आहे. गावित यांनी विधानसभा निवडणुकीत हिना गावित यांना शिवसेनेच्या आमश्या पाडवी यांच्या विरोधात अपक्ष उभे केले. मित्रपक्षाच्या उमेदवारासमोर आपल्या मुलीला उभे करणारे गावित राजकीय विश्वासाबद्दल बोलतात हे हास्यास्पद असल्याची टीका रघुवंशी यांनी केली. लोकसभा निवडणुकीत डॉ. हिना गावित यांचा आमश्या पाडवींनी प्रामाणिकपणे प्रचार केला होता असही रघुवंशी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com