Nandurbar Politics: शिवसेना, काँग्रेसला खिंडार; तब्बल सहा गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Nandurbar Shiv Sena and Congress workers join BJP: वर्षानुवर्ष काँग्रेस सोबत असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा 'हात' सोडत हाती 'कमळ' घेतले. दुर्गम भागात विकास कामे न झाल्याने अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
BJP, Congress
BJP, CongressSarkarnama
Published on
Updated on

सागर निकवाडे

Nandurbar Shiv Sena and Congress workers join BJP: वर्षानुवर्ष काँग्रेस सोबत असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा 'हात' सोडत हाती 'कमळ' घेतले. दुर्गम भागात विकास कामे न झाल्याने अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. डोंगराळ भागातील सहा गावातील शिवसेना-काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी यात समावेश आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर होण्यापूवी उत्तर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच नंदूरबार जिल्ह्यात, शिवसेना-काँग्रेसला गळती लागली आहे. नंदुरबारमध्ये शिवसेना, काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

अक्राणी तालुक्यातील सहा गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसापूर्वी भांडी वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्याप्रमाणे गर्दी झाली होती, त्याच पद्धतीने भाजप पक्ष प्रवेशासाठी नागरिकांची रांग लागली होती.

माजी मंत्री आणि भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. वर्षानुवर्ष काँग्रेस सोबत असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा 'हात' सोडत हाती 'कमळ' घेतले. दुर्गम भागात विकास कामे न झाल्याने अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. डोंगराळ भागातील सहा गावातील शिवसेना-काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी यात समावेश आहे.

अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती, पण पायाभूत सुविधा येथील नागरिकांना मिळाली नाही, काँग्रेसच्या काळात आमचा विकास झाला नाही, अशी भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या. अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघ हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अक्कलकुवा अक्राणी मतदार संघातून काँग्रेसचे के. सी. पाडवी हे सातत्याने निवडून येत होते.

BJP, Congress
Ajit Pawar: अजित पवारांचा ‘राष्ट्रवादी’ विविध वादांच्या भोवऱ्यात

या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा पराभव करत शिवसेना शिंदे गटांनी पहिल्यांदाच बाजी मारत ही विधानसभा ताब्यात घेतली असून आमश्या पाडवी हे निवडून आले आहेत. माजी मंत्री आणि भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या माजी खासदार हिना गावित यांनी देखील अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला .

अक्कलकुवा आणि अक्राणी हा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसला असला तरी गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला. काँग्रेसचे अनेक मोठे चेहरे हे इतर पक्षात पक्षांतरण झाल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला.

BJP, Congress
NCP Reunion: एकत्र येण्याच्या चर्चेचा दोन्ही ‘राष्ट्रवादीं’ना फायदा?

अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघात भाजपचे पक्की फळी नसताना देखील या ठिकाणी भाजपचे काम सुरू आहे. मात्र गावित कुटुंबीयांनी या मतदारसंघावर आपले विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. मतदारसंघात त्यांचा नेहमी संपर्क वाढत आहे. त्यातच माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या माजी खासदार डॉ. हिना गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुप्रिया गावित सातत्याने या मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना यश देखील मिळताना पाहायला मिळत आहे.

त्यातच काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील अनेक मोठे चेहरे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांच्या पक्षांना सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली. येणाऱ्या निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला नेमकं किती यश मिळतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com