Nandurbar Morcha: नंदुरबारमध्ये आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; पोलिसांच्या लाठीचार्जमुळे तणाव

Nandurbar Tribal Morcha News: नंदुरबार शहरातील आदिवासी संघटनेचा कार्यकर्ता जय वळवी याचा आपआपसांतील वादातून16 सप्टेंबरला खून झाला होता. त्यामुळे गेले काही दिवस वातावरण तापले होते.
Nandurbar Morcha .jpg
Nandurbar Morcha .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nandurbar Adivasi Morcha riots: गेले दहा दिवस शहरातील आदिवासी युवकाच्या खुणामुळे वातावरण तप्त होते. या निषेधार्थ आज निघालेल्या मोर्चाला अचानक हिंसक वळण लागले. त्यामुळे शहरात दंगल सदृश्य स्थिती झाली.

नंदुरबार (Nandurbar) शहरातील आदिवासी संघटनेचा कार्यकर्ता जय वळवी याचा आपआपसांतील वादातून 16 सप्टेंबरला खून झाला होता. त्यामुळे गेले काही दिवस वातावरण तापले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनांनी बुधवारी (ता.24) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

आज शहरातील नेहरू चौक येथून निघालेल्या मोर्चात (Morcha) हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. हा मोर्चा मूक मोर्चा असल्याने तो शांततेत पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्याचा समारोप झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयात मृत जय वळवी याच्या कुटुंबीयांसह आठ ते दहा कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी गेले. जिल्हाधिकारी मिताली शेठी निवेदन स्वीकारले. जिल्हा पोलीस प्रमुख श्रवण दत्त यांनी अपराधीवर कडक कारवाईच्या आश्वासन दिले.

Nandurbar Morcha .jpg
Dharashiv Flood Help Kit Controversy: पूरग्रस्तांच्या 'मदत किट'वर शिंदे-सरनाईकांचे फोटो छापणं भाजपच्या बड्या नेत्यालाही खटकलं; म्हणाले...

त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख श्रवण दत्त यांनी मोर्चा संबोधित केले. आरोपींवर कारवाईचे आश्वासन देत शांततेचे आवाहन केले. मोर्चाचा समारोप शांततेत होत असतानाच काही उत्साही तरुणांनी घोषणा देण्यास सुरुवात केली.

उत्साही तरुणांच्या घोषणामुळे मोर्चाचे वातावरण एकदम बदलले. अधिकारी कार्यालयात काहींनी दगडफेक. आवारात उभ्या असलेल्या वाहनांची मोडतोड करण्यास सुरुवात झाली. काही वाहने उलटविण्यात आली.

Nandurbar Morcha .jpg
Supriya Sule : फडणवीस वेळ देत नाहीत; सुप्रिया सुळे अन् सात खासदारांनी घेतली थेट अमित शहांची भेट, केल्या 3 महत्त्वाच्या मागण्या

परिस्थिती चिघळण्याची चिन्हे लक्षात येतात पोलिसांनी जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही काही युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केला.

जय वळवी यांच्या हत्येतील संशयित आरोपी भैय्या मराठे आणि अन्य काही लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील पोलीस कोठडीत आहेत. यावेळी अति उत्साही युवकांनी आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी केली. यावरून वातावरण चिघळले असे उपस्थित त्यांनी सांगितले.

Nandurbar Morcha .jpg
Wardha News: संतापलेल्या शेतकऱ्यानं थेट जिल्हाधिकारी कार्यालयालाच खेचलं कोर्टात,जप्तीच्या आदेशानं उडाली तारांबळ

या मोर्चाला मोठा प्रतिसाद असल्याने सकाळपासूनच नंदुरबार शहरात व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता. मोर्चा निघाल्यावर अनेक नागरिक त्यात सहभागी झाले. गौतम्शी आदिवासी संघटनांनी व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com