
Vidarbha News: राज्य महामार्गाकरिता संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला वेळीच न देण्यात आल्याने जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशान्वये मंगळवारी (ता. 23) वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर (Wardha Collector Office) साहित्य जप्तीची नामुष्की ओढवली होती. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांच्या दालनात सुमारे दीड तास चाललेल्या झालेल्या चर्चेअंती संबंधित शेतकर्याला ठोस लेखी आश्वासन देण्यात आल्याने ही जप्तीची नामुष्की टळली.
पूर्वीचा वर्धा दक्षिण वळण मार्ग तर आताचा राज्य महामार्ग 331 या चारपदरी मार्गाकरिता शेतकर्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले. मोठा निधी खर्च करून हा महामार्ग पूर्णत्वास गेला असला तरी महामार्ग परिसरातील उच्च विद्युत वाहिनी कायम असल्याने अजूनही अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.
या महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला न देण्यात आल्याने शेतकर्याने जिल्हा सत्र न्यायालयात (Court) धाव घेतली. न्यायालयाने शेतकर्याच्या बाजूने निर्णय देत थेट जिल्हाधिकारी वर्धा नावाने साहित्य जप्तीचे आदेश निर्गमित केले.
संबंधित आदेश घेत न्यायालयीन अधिकारी मंगळवारी (ता.23) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्याने जिल्हाधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांची यावेळी एकच तारांबळ उडाली.
सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनातील भूसंपादन विभागाच्या वतीने ठोस लेखी आश्वासन देण्यात आल्याने आणि ते शेतकर्यानेही मान्य केल्याने अखेर जप्तीची नामुष्की टळली.
वर्धा शहराशेजारील दत्तपूर चौक ते सेवाग्राम मार्गावरील इंदिरा गांधी उड्डाण पूल चौक या वर्धा दक्षिण वळण मार्गासाठी 2022 मध्ये स्नेहलनगर येथील रहिवासी कमलाकर उमाटे व सुधाकर उमाटे यांची 22 आर जमीन जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागाच्या देखरेखीत अधिग्रहित करण्यात आली होती. सुरवातीला त्यांना 55 हजार इतका मोबदला देण्यात आला. हा मोबदला अतिशय ताेकडा असल्याने त्यांनी वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली.
याचिका निकाली काढताना न्यायालयानेही शेतकर्याच्या बाजूने निर्णय देत वाढीव मोबदला देण्याचा आदेश निर्गमित केले. मात्र, वाढीव मोबदला देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने शेतकर्याने पुन्हा एकदा न्यायालयाचे दार ठोठावले. याच याचिकेवर सुनावणी घेत जिल्हा सत्र न्यायालयाने जप्तीचे आदेश निर्गमित केले. आदेशानुसार न्यायालयीन अधिकारी व संबंधित शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.