Dharashiv Flood Help Kit Controversy: पूरग्रस्तांच्या 'मदत किट'वर शिंदे-सरनाईकांचे फोटो छापणं भाजपच्या बड्या नेत्यालाही खटकलं; म्हणाले...

Eknath Shinde Pratap Sarnaik Photo On Help Kit : धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापल्याचं समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता महसूलमंत्री आणि महायुतीतील भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dharashiv Help Kit Controversy .jpg
Dharashiv Help Kit Controversy .jpgSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मराठवाड्याला बसला आहे. बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे.या नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना वाटप करण्यात आलेल्या मदत कीटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे (Dharashiv) पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापण्यात आल्यानं मोठा राजकीय वाद पेटला आहे. याच वादावर आता भाजपच्या बड्या नेत्यालाही खटकल्याचं समोर आलं आहे.

मराठवाड्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसह विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकरी कर्जमाफी करण्यासाठीचा महायुती सरकारवरील दबाव वाढत चालला आहे. पण याचवेळी धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापल्याचं समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता महसूलमंत्री आणि महायुतीतील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या किटवर शिंदे आणि सरनाईकांचे फोटो छापल्याबाबत मला नेमकी माहिती नाही, पण मदतीमध्ये कोणतीही जाहिरातबाजी करण्यात येऊ नये असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी शिंदे हे भावनिक नेते आहेत, अशात त्यांनी काही केले असेल, तर त्याची मला माहिती नाही असं सूचक विधानही बावनकुळे यांनी केलं आहे.

बावनकुळे म्हणाले, मदतीमध्ये जाहिरातबाजी येऊ नये. मदत ही सढळ हाताने करण्यात यावी आणि दाखवण्यासाठी करण्यात येऊ नये. मतं मिळवण्याचा हा प्रसंग नाही. लोकांना आधार देण्याचं हे काम आहे. जाहिरातबाजी न करण्याची जबाबदारी आपली आहे. पुराच्या काळात मदतीमध्ये कोणतेही राजकारण येता कामा नये ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं बावनकुळे म्हणाले.

Dharashiv Help Kit Controversy .jpg
Wardha News: संतापलेल्या शेतकऱ्यानं थेट जिल्हाधिकारी कार्यालयालाच खेचलं कोर्टात,जप्तीच्या आदेशानं उडाली तारांबळ

"घरात पाणी शिरले तर दोन-तीन महिने घर सेटल व्हायला लागतात. लोक काय खातील आणि कसे जगतील हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. अशात काहींचा संताप होतो, आम्ही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत आहोत,असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

राज्याचे महसूलमंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, यापूर्वीही अनेकांनी असे मदत कीटवर फोटो लावले आहेत, काय काय आणि कशी मदत केली होती, हे सर्वांना माहिती आहे. मदतीत जाहिरातबाजी येऊ नये. पण विरोधकांनीही या आधी अशा जाहिराती केल्याचं निदर्शनास आणून दिलं.

Dharashiv Help Kit Controversy .jpg
Sharad Pawar News: पुणे दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनाही करावा लागला नागरिकांच्या संतापाचा सामना; गाडी अडवत केली मोठी मागणी

बावनकुळे यांनी यावेळी विरोधकांनी दाखवण्यासाठी अनेकदा मदत केल्याच आरोप केला. विरोधकांनी त्यांच्या सत्ताकाळात सांगितलं 10 किलो आणि दिलं 1 किलो अशी परिस्थिती होती असा खोचक टोलाही बावनकुळेंनी लगावला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील पालकमंत्री हे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी बांधावर पोहोचले आहेत. मराठवाड्यात मागील 50 वर्षात जितका पाऊस झाला नाही तितका पाऊस झाला. त्यामुळे मालमत्ता, शेती, जनावरांचे नुकसान झाले असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Dharashiv Help Kit Controversy .jpg
Tanaji Sawant : पुरग्रस्तांच्या मदत किटवर नेत्यांचे फोटो का? शिंदेंची बाजू सावरण्यासाठी तानाजी सावंतांची धडपड, मंत्रिपद फिक्स झाले?

मला सूचना आहेत की, पंचनाम्यांकडे लक्ष द्या, पंचनामे झाल्याशिवाय मदत मिळत नाही. पण जिल्हाधिकारी, ग्रामपंचायतपर्यंतचे प्रशासन ते एनडीआरएफ आणि एसडीआरएफ देखील काम करत आहेत. फिल्डवर राहा अशा सूचना पालकमंत्र्यांना दिल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com