नंदूरबार : भाजप नेते डॉ.विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हिना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित (Supriya Gavit) यांना कोडदा गटातून विजयी झाल्या आहेत. नंदुरबार कोळदा गटातून भाजप आमदार डाँ. विजयकुमार गावित यांच्या कन्या सुप्रिया गावित (Supriya Gavit) या 1326 मतांनी विजयी झाल्या आहेत. (Nandurbar ZP Election)
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील रिक्त झालेल्या 11 जिल्हा परिषद सदस्य आणि 14 पंचायत समिती सदस्यांची निवडणूक काल झाली. स्थानिक मुद्यावर ही निवडणुकीचा प्रचार झाला. जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या विशेषत काँग्रेस, भाजप, शिवसेना नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली होती.
पालघरच्या पंचायत समितीचा निकाल नुकताच हाती आला आहे. पालघरच्या पंचायत समितीत सावरा एम्बुरमध्ये शिवसेनेने आपला झेंडा फडकवला असून शिवसेनेच्या विनया पाटील बहूमताने निवडूण आल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेत 15 तर पंचायत समितीच्या 14 जागांसाठी मतदान पार पडले होते. तर जिल्ह्यात 65% मतदान झाले होते.
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakat Patil) यांची कन्या धरती देवरे (Dharti Deore) धुळे मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. तर कॉग्रेसने आपले खातं उघडले आहे. नंदूरबार काँग्रेस ने खाते उघडले, म्हसावद गटातून काँग्रेस च्या हेमलता शितोळे विजयी झाल्या आहेत. हेमलता शितोळे 2934 मतांनी विजयी झाल्या आहेत.
ओबीसी आरक्षण रद्द होण्यापूर्वीचं नंदुरबार जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
काँग्रेस : 23
भाजपा : 23
शिवसेना : 7
राष्ट्रवादी : 3
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.