Assembly Election 2024: आमदारकीची भुरळ पडल्याने 'या' मतदारसंघांमध्ये बापलेकातच चुरस?

Nashik politics : सत्ताधाऱ्यांनी राजकीय पक्ष फोडल्याने नव्या दमाच्या उमेदवारांना पडताहेत आमदारकीची स्वप्ने...
Narhari Zirwal, Manikrao Kokate & J. P. Gavit
Narhari Zirwal, Manikrao Kokate & J. P. GavitSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics News : विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे अनेक नव्या दमाच्या उमेदवारांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत. त्या नाशिकच्या काही मतदारसंघात चक्क बाप लेकांमध्येच उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, कळवण- सुरगाणा यांसर विविध विधानसभा मतदारसंघात एकाच कुटुंबातील अनेक उमेदवारी इच्छुक असल्याचे चित्र आहे. यामध्ये चक्क बाप लेकच एकमेकांच्या विरोधात उमेदवारी करण्यास सिद्ध झाले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांतील राजकीय वाद थेट कुटूंबापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकीत एका पक्षात नव्हे तर कुटुंबातही फूट पडल्यास आश्चर्य वाटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली. त्यामुळे बहुतांशी आमदार सत्ताधारी पक्षात सामील झाले आहेत. या स्थितीत विरोधकांकडे मात्र उमेदवारीसाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

राजकारणाचा वारसा असलेल्या अनेक कुटुंबांमध्ये नव्या पिढीला आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. या युवा नेत्यांकडून थेट वरिष्ठांच्या गाठीभेटी सुरू आहेत. उमेदवारीची मागणी केली जात आहे. या घडामोडींमुळे प्रस्थापित आमदारांची मात्र झोप उडाली आहे.

Narhari Zirwal, Manikrao Kokate & J. P. Gavit
Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाने सरकारची केली कोंडी, सत्ताधारी आमदारही वैतागले!

दिंडोरी मतदार संघात गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितली आहे. यापूर्वी देखील त्यांनी लोकसभेची उमेदवारी मागीतली होती. त्यांनी ज्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मागितली, तेथे त्यांचे वडील आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार आहेत.

श्री झिरवाळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. त्यामुळे दोन पक्षांकडे दोन उमेदवार असल्याने या मतदार संघात कदाचित पिता-पुत्रांमध्येच लढत होऊ शकते.

Narhari Zirwal, Manikrao Kokate & J. P. Gavit
Maratha Vs OBC : मराठा समाजाला दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा, ओबीसी पेटले...

अशीच स्थिती कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात आहे. येथे माकपचे माजी आमदार जे. पी. गावित महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतील. त्यांचे पुत्र इंद्रजीत गावित हे देखील उमेदवारी करण्यास उत्सुक आहेत. त्यांनी यापूर्वीही अन्य पक्षांकडे उमेदवारीसाठी चाचपणी करून पाहिली आहे.

सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी लोकसभेची उमेदवारी करावी, यासाठी अनेक समर्थकांनी दबाव आणला होता. यामध्ये आमदार कोकाटे खासदार झाल्यास सिन्नर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त होईल. हे लॉजिक होते. तसे झाल्यास आमदार कोकाटे यांची कन्या सीमांतिनी कोकाटे या विधानसभेचे उमेदवारी करू शकतात. ही शक्यता अद्यापही पूर्णपणे मावळलेली नाही.

आमदार कोकाटे आमदार झाल्यास ही त्यांची पाचवी टर्म असल्याने ते मंत्री होऊ शकतील असे लॉजिक त्यांचे समर्थक माडतात. नव्या पिढीला संधी मिळावी म्हणून सीमांतिनी कोकाटे यांच्या उमेदवारीसाठी युवा वर्ग उत्सुक आहे.

Narhari Zirwal, Manikrao Kokate & J. P. Gavit
मुख्यमंत्र्यांनी थोड ठाण्याच्या पुढेही यावं, खड्डे पहावे!

नाशिक जिल्ह्याबरोबरच राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये ही स्थिती आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे अनेक ठिकाणी चार ते पाच टन एकाच कुटुंबातील सदस्य आमदार आहेत. अशा स्थितीत राजकारणात सक्रिय असलेली दुसरी पिढी संधीच्या शोधात आहे. सध्या नव्या नेतृत्वासाठी एक स्पेस तयार झाली आहे.

निवडणूक पाच वर्षातून एकदाच होते. ही संधी हुकल्यास राजकीय भवितव्यासाठी प्रदिर्घ काळ वाट पहावी लागते. त्यामुळे ही संधी सोडण्यास अनेक तरुण तयार नाही. यातून अनेक ठिकाणी बापलेकांतच लढत झालेली दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com