कोरोनातील विधवा भगिनींना मालमत्तेत मिळणार हक्क!

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोरोना पुनर्वसनाच्या नाशिक जिल्हा प्रशासनाच्या कामाचे कौतुक.
Dr Neelam Gorhe
Dr Neelam GorheSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : कोरोनाकाळ (Corona epidemic) निश्चितच वाईट होता. अनेक कुटुंबे उध्वस्त, निराधार झाली. अनेकांचे पालकत्व हिरावले गेले. अशा कुटुंबियांचे पुनर्वसनात (rehabilitation) नाशिक (Nashik) जिल्हा प्रशासनाचे काम चांगले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने कोरोनात विधवा झालेल्या भगिनींना मालमत्तेत हक्क मिळणार आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले आहे.

Dr Neelam Gorhe
आठ वर्षे धूळखात पडलेली फाईल भुजबळांनी लावली मार्गी!

त्र्यंबकेश्वर येथील शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी इगतपुरीचे प्रांताधिकारी अधिकारी तेजस चव्हाण, मुख्याधिकरी संजय जाधव, नायब तहसीलदार सतीश निकम उपस्थित होते.

Dr Neelam Gorhe
डॉ. बाबासाहेबांच्या घटनेमुळे संपूर्ण देश एकसंघ

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, कोरोनात निराधार झालेल्या पाल्यांची आणि मदतीसाठी पात्र कुटुंबांची यादी सोबत आणली असून, त्याबाबतचा पाठपुरावा करणार आहे. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनात आधार गमावलेल्यांचे पुनर्वसनाचे खूप चांगले काम केले आहे. विशेष म्हणजे कोरोनात विधवा आलेल्या भगीनींना मालमत्तेचा अधिकार मिळावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे अनेकांना आधार मिळाला. कोरोनात पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी राज्य आणि केंद्र शासनाने काही योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता परिस्थिती सुधारतांना दिसत आहे.

आधार गमावलेल्या या कुटुंबांच्या पाठीशी समाजानेही उभं राहणं तितकेच गरजेचे आहे. तसेच ज्यांच्या घरातील कमावणारी व्यक्ती, व्यावसायिक कोरोनात दगावली आहे, अशा कुटुंबातील वारसदारांना पुढील व्यवसायासाठी कागदपत्रे हस्तातंरीत करून देणे, अनुदान देणे, त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, बाजारपेठेतील सामुग्री मिळवून देणे यासाठी जिल्हा मदत केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, विविध बँका यांच्यामार्फत मदत करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

नाशिकशी कौटुंबिक ऋणानुबंध

नाशिक हे आमच्या पूर्वजांचे गाव आहे. सात ते आठ पिढ्यांपूर्वी चांदवडला आमचे पूर्वज राहत होते. त्यानंतर ते काही काळ त्र्यंबकेश्वरमध्ये होते. त्यामुळे नाशिक, त्र्यंबक आणि चांदवडशी आमचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. माझं नाशिक जिल्ह्याशी अंतकरणाचे नातं आहे, अशा आठवणींनाही यावेळी नीलम गोऱ्हे यांनी उजाळा दिला.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com