Ajit Pawar: 'हा फक्त मृत्यू नाही, ही बहुजन समाजाची अंधारी रात्र'; ॲड. भगीरथ शिंदेंचा हुंदका, शब्दही थरथरले!

Nashik Ajit Pawar MVP, Rayat Institutute condolence meeting: Darkness looms over Bahujan Samaj educational institutions in the state -नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शोकसभेला नेते झाले भावनिक
Ajit-Pawar
Ajit-PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दोन दिवसांपूर्वी विमान अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभरात शिक्षण आणि सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला. ही महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी आहे.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी झालेल्या शोकसभेत जिल्ह्यातील राजकीय नेते आणि शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मोठी गर्दी उसळली होती.

संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी शोकसभा आयोजित केली होती. संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले, माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार, शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील, माजी खासदार देविदास पिंगळे यांसह विविध नेत्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या आठवणी जागवल्या. असा नेता पुन्हा महाराष्ट्रात होणे दुर्मिळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Ajit-Pawar
Nashik Mayor Politics: गिरीश महाजनांच्या मनात चाललंय तरी काय? महापौरपदाचा निर्णय पुन्हा लांबणीवर!

दिवंगत अजित पवार यांच्यासमवेत काम केलेले रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड भगीरथ शिंदे यांनी राज्याची जाण असलेला नेता हरपला असे सांगितले. ते म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार असल्याने रयत शिक्षण संस्थेचे कोणतेही प्रश्न लगेचच सुटत होते. एक प्रकारे राज्यातील शिक्षण संस्थांचे प्रश्न त्यामुळे निकाली निघत होते.

Ajit-Pawar
Shivsena UBT Politics: ठाकरेंच्या गटनेतेपदी निष्ठावंत केशव पोरजे; शिवसेना महापालिकेत आक्रमक होणार!

आज बहुजन समाजाच्या शिक्षण संस्थांपुढे गंभीर समस्या आहेत. अनेक अडथळे या संस्थांपुढे उभे आहेत. त्यातून त्यांची सुटका आणि मार्ग निघणे हे आव्हान आहे. त्याचे गांभिर्य समजून घेतले पाहिजे. ते सोडविण्यासाठी कोण मदतीला येणार?, असा प्रश्न त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनाने बहुजन समाजाचे नेतृत्व हरपले आहे. या समाजाला नेतृत्व देऊ शकेल असा नवा नेता निर्माण होणे याला प्रदीर्घ कालावधी लागेल. उपमुख्यमंत्री पवार यांची प्रत्येक प्रश्न सोडविण्याची हातोटी होती.

दिवंगत पवार यांच्या नसण्याने बहुजन समाजाच्या राज्यातील शिक्षण संस्थांपुढे अंधार दाटला आहे. या प्रश्नाचे गांभीर्य समजून घेतले पाहिजे. या अंधारातून दिशा दाखवील अशा नेतृत्वाला आपण मुकलो आहे. त्याचा मोठा धक्का राज्यातील नव्या नेतृत्वाला आणि शेतकऱ्यांना बसणार आहे, असे ॲड शिंदे म्हणाले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com