Supriya Sule Nashik Morcha : एक महिना प्रेमाने व आदराने विनंती करत राहू, पण देवाभाऊ त्यानंतर..सुप्रिया सुळेंचा गंभीर इशारा

Nashik NCP Sharad Pawar Morcha : नाशिकमध्ये आयोजित भव्य आक्रोश मोर्चात खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी शेतकरी कर्जमाफी वरुन त्यांनी फडणवीस सरकारला गंभीर इशारा दिला.
Supriya Sule on Devendra Fadnavis
Supriya Sule on Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik NCP Sharad Pawar Morcha : शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने नाशिकमध्ये सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भव्य आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना संबोधित करतानाच शेतकरी कर्जमाफी करण्याचे आवाहन करताना देवेंद्र फडणवीस सरकारला गंभीर इशारा दिला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आज नाशिकला आपण सगळे सरसकट कर्जमाफी मागण्यासाठी आलो आहोत. ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे. मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करते की, या मोर्चानंतर आपण विनम्रपणे आपआपल्या जिह्यात जा आणि तुमच्या कलेक्टरला भेटा. त्यांना विनंती करा की, तुम्ही मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगा की तुम्ही सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता. ओला दुष्काळ जाहीर करा व सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी करा.

जर एक महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही, तर या सरकारला आम्ही कुठेही फिरु देणार नाही असा इशारा यावेळी सुप्रिया सुळेंनी दिला. त्या पुढे म्हणाल्या.. एकतर आमच्या लाडक्या बहिणींना निधी दिला. दिला तर दिला त्यात पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख महिलांची नावे कमी केली, हे आम्ही सहन करणार नाही. याविरोधात मोठं जनआंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गावा गावात-वस्त्यांवर जाऊ ..ज्या महिलांचे पैसे बंद केले आहेत, तिच्याशी संघर्ष करु व पैसे मिळवून देऊ..असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule on Devendra Fadnavis
Nashik Kumbh Mela 2027 : दिल्लीत झालेली चूक नाशिकमध्ये सुधारली : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय

तसेच प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी करु. तुम्ही म्हटला होता सरसकट कर्जमाफी करु. आम्हीही एकदा असा शब्द दिला होता. तेव्हा युपीएचं सरकार होतं. मनमोहन सिंह हे पंतप्रधान होते. आदरणीय पवार साहेब कृषीमंत्री होते. तेव्हा एक -दोन नाही तर तब्बल सत्तर हजार करोड रुपयांची कर्जमाफी केली होती. शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला होता असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आम्ही एक महिना विनंती करु. एक महिन्यानंतर जर या देवाभाऊच्या सरकारने सरसकट कर्जमाफी दिली नाही तर आम्ही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला.

Supriya Sule on Devendra Fadnavis
Sharad Pawar Politics: शरद पवारांचा इशारा...केवळ होर्डीग्ज लाऊन नव्हे, शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या!

जिल्हा बॅंकेची चौकशी

नाशिक जिल्हा बॅंकेने पाचष्ट हजार शेतकऱ्यांची नावे कमी करुन, त्या जागेवर नवीन कुठली तरी नावे घेतली आमच्यावर अन्याय केल्याची माहिती मला एका शेतकऱ्याने दिली. आम्ही सगळे आठ खासदार दिल्लीला जाऊ..आम्ही केंद्र सरकारकडे न्याय मागू आणि नाशिक जिल्हा बॅंकेची चौकशी लावण्याची जबाबदारी आजपासून आमची असा शब्द सुप्रिया सुळेंनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यासाठी कितीही आंदोलने करु पण न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com