Sanjay Raut On MVA : 'जिंकेल त्याची जागा' ; महाविकास आघाडीच्या जागावाटप फॉर्म्युल्यावर राऊत यांचं सूचक वक्तव्य !

Mahavikas Aghadi Seat Allocation Formula : "लोकसभा निवडणुकांचा आढावा घेण्यात येत आहे."
Sanjay Raut On MVA :
Sanjay Raut On MVA : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. सर्वच पक्ष बैठका घेऊन चाचपणी करीत असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन कोणताही तिढा नाही, जो जिंकेल ती जागा त्यांची असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सूतोवाच राऊतांनी केले आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut On MVA :
Kishor Patil On Sanjay Raut : संजय राऊत उद्धव ठाकरेंची दिशाभूल करतात; कशी... ते किशोर पाटलांनी सांगितलं

महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन कोणतेही मतभेद नाही. जो जिंकेल ती जागा त्यांची असणार आहे. राज्य सरकार गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीपासून पळ काढत आहे. राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घेत नाही. पराभवाच्या भीतीमुळे कोणत्याही निवडणुका सरकार घेत नसल्याचे, संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut On MVA :
Pimpri Chinchwad NCP Politics : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत जुंपली, शरद पवार गटाने केली शहर पक्ष कार्यालय सोडण्याची मागणी

"राज्य सरकारने भीतीमुळे मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक रद्द केली असल्याचा आरोपही खासदार राऊत यांनी केला. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मातोश्री निवासस्थानी लोकसभा निवडणुकांचा आढावा घेण्यात येत आहे. आढावा बैठकीचा आज तिसरा दिवस आहे. आज बारामती, मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे," असे राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com