Raju Shetty On Sharad Pawar : स्पष्टता नसल्याने शरद पवारांबाबत मला शंका वाटते!

Raju Shetty said that he has doubts some about Sharad Pawar-महाविकास आघाडीचा घटक असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्याबाबत सुचक विधान केले.
Sharad Pawar & Raju Shetty
Sharad Pawar & Raju ShettySarkarnama

Raju Shetty News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि पक्षातून बाहेर पडून भाजपला पाठींबा दिलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीचे राजकीय कवीत्व संपण्याची चिन्हे नाहीत. आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यावर वक्तव्य दिले आहे. (Political confusion on Sharad Pawar & Ajit pawar meeting is not over)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) प्रमुख नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी शंका वाटते, असे वक्तव्य केले.

Sharad Pawar & Raju Shetty
Dada Bhuse News : दादा भुसेंकडून नरहरी झिरवाळ, काँग्रेसच्या खोसकरांची कोंडी?

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या ताज्या वक्तव्याने या आघाडीत नवा विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत मला शंका वाटते असे शेट्टी म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. याबाबत जे स्पष्टीकरण देण्यात आले, त्याबाबत शेट्टी समाधानी नाहीत. ते म्हणाले, नातेसंबंध असले तरीही त्यात स्पष्टता हवी, मात्र पवारांच्या भूमिकेत सध्या स्पष्टता दिसत नाही, त्यांनी कठोर भूमिका घेणं गरजेच आहे.

Sharad Pawar & Raju Shetty
Rahul Gandhi Bungalow News : राहुल गांधींचा पत्ता पुन्हा बदलणार; काय आहे कारण?

नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर ते बोलत होते. कुणाला विरोध करायचा म्हणून सोबत जाणे योग्य नाही. आमचा महाविकास आघाडीचा अनुभव वाईट असल्याचेही त्यांनी सांगितले.

`इंडिया` आघाडी बाबत ते म्हणाले, बैठकीसाठी नाना पटोले यांचा अनौपचारिक फोन आला होता. बच्चू कडू यांच्या मनात यायला उशीर झाला, पण उशिरा का होईना त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. लहान पक्षांवर आता लोकांचा विश्वास आहे. आम्ही चळवळीत काम करणारे लोक आहोत. रस्ता काटेरी आहे.

Sharad Pawar & Raju Shetty
Sharad Pawar News : शरद पवारांनी शड्डू ठोकला, अजित पवार गटाची धाकधूक वाढली, येवला, बीडनंतर आता खडसेंच्या जळगावात सभा

रविकांत तुपकर प्रकरणावर ते म्हणाले, मला पत्र लिहिलं आहे, पण निर्णय घेणारा मी नाही. ते पत्र समितीकडे पाठविले आहे. समितीने मलाही काही प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे मी देईन. मला त्यात मान अपमान वाटत नाही, असाही खुलासा शेट्टी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com