Kalpana Kharat bail hearing : 'कुकर्म त्याचं, मी का भोगू'; खरातची पत्नी कल्पनाचा न्यायालयातील युक्तिवादानं खळबळ

Hearing held in Rahata court on bail plea of Kalpana Kharat in Shirdi-registered case : अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात शिर्डी इथं दाखल गुन्ह्यात जामीन अर्जावर राहाता न्यायालयात सुनावणी झाली.
Kalpana Kharat bail hearing
Kalpana Kharat bail hearingSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat scandal : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणामध्ये आपला कोणताही सहभाग नव्हता, असा दावा त्याची पत्नी कल्पना खरात हिने जामीन अर्जाच्या सुनावणीत केला आहे. अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात बेकायदेशीर सावकारकीचा अन् जमीन व्यवहारातील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

या गु्न्ह्यात जामीन मिळवण्यासाठी पसार असलेल्या कल्पना खरात हिने राहाता न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या जामीन अर्जावर आज राहाता न्यायालयात सुनावणी झाली. कल्पना खरात हिने न्यायालयात घेतलेल्या या भूमिकेवरून बाल कथा 'वाल्या कोळी'च्या गोष्टीला उजाळा मिळाला आहे.

कल्पना खरात हिने अटकपूर्व जामिन अर्ज राहाता न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी पार पडली. या वेळी आरोपी कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात कल्पना खरातचा कोणत्याही प्रकरणात सहभाग नसल्याचा दावा केला. कल्पना खरात हिचे सगळे खाते तिचे पती अशोक खरात (Ashok Kharat) हे ऑपरेट करत होते, असा दावा केला आहे. त्यामुळे कल्पना खरातने देखील हातवर केले असून, सगळे आरोप अशोक खरातवर ढकलल्याचे दिसते.

कल्पना खरातच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हणाले, "तब्बल दीड वर्षांनंतर गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. अशोक खरात याच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर शिर्डी इथल्या गोंदकर यांनी जुन्या व्यवहाराचा फायदा मिळतो का, या उद्देशाने शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. किरण सोनवणे याने वेळोवेळी अशोक खरात याला भेटून पैसे दिले. पण सर्व बैठकांमध्ये कल्पना खरात उपस्थित नव्हती. तसंच कुठल्याही व्यवहाराला कल्पना खरात ही केव्हाच उपस्थित नव्हती, असे फिर्यादीनेच म्हटलं आहे."

Kalpana Kharat bail hearing
Kalpana Kharat Investigation : ऐशोआरामी जीवनात रमलेली कल्पना खरात; लग्नपूर्वी होती सुनीता, कुटुंबाची 'हिस्ट्री' समजावून घ्या...

फिर्यादीला दिवाणी न्यायालयात जायला मुभा होती, संधी होती, तरी देखील तो गेला नाही. जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर फिर्यादीने जवळपास एक वर्ष कुठल्याही न्यायालयात दाद मागितली नाही. फक्त आणि फक्त अशोक खरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जमीन परत मिळवण्यासाठी फिर्यादीने गुन्हा दाखल केला.

Kalpana Kharat bail hearing
Ashok Kharat : कोट्यवधींचा खेळ 'समता'त! चाकणकर नावाची दोन खाती, अशोक खरातच्या शेकडो खात्यांनी उडवली खळबळ

अशोक खरातच कल्पनाचे खाते ऑपरेट करायचा

तसंच कल्पना खरात हिचे सगळे सर्व बँक खाते तिचे पती कॅप्टन अशोक खरात हे ऑपरेट करायचा. फक्त पत्नी कल्पना खरात हिच्या खात्यातून पैसे गेले म्हणून तिला आरोपी करता येणार नाही, अशोक खरात याने व्याजाची रक्कम मागितली आहे, कल्पना खरात हिने कधीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष व्याजाची रक्कम फिर्यादीला मागितली नाही, याकडे कल्पना खरातच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधलं.

कल्पनाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही

शिवसंकल्प हार्डवेअर हा व्यवसाय असून, कल्पना खरात आयकर विभागाला संपूर्ण आयकर भरते. कल्पना खरातच्या विरहित जमिनीचा व्यवहार झाला असून, तत्यामध्ये आरोपी करू नये. कल्पना खरात यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. यानुसार कल्पना खरात हिला अटकपूर्व जामीन मिळावा.

'वाल्या कोळी'च्या गोष्टीचा प्रत्यय

कल्पना खरात हिच्या वकिलांच्या युक्तिवादानुसार सर्व प्रकरणाला अप्रत्यक्षरित्या अशोक खरात जबाबदार आहे. कल्पना खरातच्या या भूमिकेमुळे अशोक खरात हा एकटाच, सर्व कांडाला जबाबदार असल्याचे दिसते. कल्पना खरात हिच्या या भूमिकेमुळे अशोक खरात प्रकरणात खळबळ उडाली असून, वाल्या कोळीच्या गोष्टीचा प्रत्यय येऊ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com