Girish-Mahajan, Devyani Pharande & Rahul Dhikle
Girish-Mahajan, Devyani Pharande & Rahul DhikleSarkarnama

Devendra Fadnavis Politics: भाजपने महापालिका निवडणुकीचा कारभारी बदलला; नाशिकच्या भाजपमध्ये 'ऑल इज नॉट वेल'

Devendra Fadnavis BJP strategy in Nashik: महापालिका निवडणुकीची सूत्रे अचानक आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे गेल्याने पक्षात अंतर्गत वादाची चर्चा
Published on

Nashik BJP News: महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपने इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आटोपला. मात्र ऐनवेळी निवडणुकीची सुत्रे नव्या नेत्याकडे सोपविली आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने ‘हंड्रेड प्लस’ची घोषणा केली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे त्याची सर्व सूत्रे आहेत. त्या दृष्टीने भाजप जोरदार कामाला लागला आहे.

निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच गुरूवारी भाजपने काही महत्त्वाचे बदल केले. आमदार राहुल ढिकले यांच्यावर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी होती. त्यात अनपेक्षित पणे बदल करीत आमदार देवयानी फरांदे यांची नियुक्ती करण्यात आली.

Girish-Mahajan, Devyani Pharande & Rahul Dhikle
Ajit Pawar Politics: महायुती इफेक्ट, महापालिकेसाठी अजित पवारांच्या पक्षाकडे इच्छुकांच्या रांगा!

महापालिका निवडणुकांसाठीचा मुलाखतींचा पहिला टप्पा भाजपने पार केला आहे. सध्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. अशातच इच्छुकांची जोरदार फील्डिंग सुरू आहे.

Girish-Mahajan, Devyani Pharande & Rahul Dhikle
Girish Mahajan Politics: गिरीश महाजनांची अचूक खेळी, गुलाबरावांना घेणार बरोबर; अजितदादांच्या राष्ट्रवादीला दाखवला ‘कात्रजचा घाट’!

निवडणुकीची सर्व सूत्रे जलसंपदा मंत्री महाजन यांच्याकडे आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेने आमदार राहुल ढिकले यांच्यावर निवडणुकीची सर्व जबाबदारी सोपविण्यात आली होती. आमदार राहुल ढिकले यांनी शहरभर कामाला गती दिली होती.

आमदार ढिकले यांनी निवडणुकीची प्राथमिक तयारी केली असतानाच पक्षात हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आमदार देवयानी फरांदे यांचे नियुक्ती केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार फरांदे या कोणाच्या जवळच्या याची नवी चर्चा आता होत आहे.

भाजपने महायुती करण्याचे संकेत दिले आहेत. त्याची चर्चा अद्याप सुरू झालेली नाही. असे असतानाच निवडणूक प्रक्रिया आणि इच्छुकांच्या लॉबिंगची चर्चा सुरू झाली आहे. त्याचा परिपाक म्हणूनच निवडणूक प्रमुख पदी आमदार फरांदे यांचे नियुक्ती झाल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे आमदार फरांदे यांना आपल्या कुटुंबातील सदस्याला नगरसेवक म्हणून पुनर्वसन करावयाचे आहे. आमदार फरांदे यांच्या संपर्कातील अनेकांना उमेदवारीची अपेक्षा आहे. अशीच स्थिती अन्य नेत्यांची देखील आहे. त्या नेत्यांना आमदार ढिकले यांच्याकडे फारसे महत्त्व मिळण्याची शक्यता नव्हती, अशी चर्चा आहे.

भाजपमध्ये सध्या विविध नेत्यांचे गट कार्यरत आहेत. त्यात आमदार निवडणुकीत आपल्या अनुयायाला उमेदवारी देण्यासाठी झटत आहेत. या गटबाजीतूनच पक्षाने महापालिका निवडणुकीची जबाबदारी बदलली, असे बोलले जाते. त्यामुळेच या महत्त्वाच्या बदलामागे पक्षातील गटबाजीचा वास येऊ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com