Ajit Pawar Politics: महायुती इफेक्ट, महापालिकेसाठी अजित पवारांच्या पक्षाकडे इच्छुकांच्या रांगा!

Nashik Ajit Pawar NMC Election Politics Sameer Bhujbal Aspiring Corporator Interviews-महापालिका जागावाटपात फारशा अपेक्षा नसतानाही अजित पवारांकडे इच्छुकांची गर्दी चर्चेत
Ajit-Pawar
Ajit-PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP Ajit Pawar News: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मुलाखती सुरू झाल्या. या मुलाखती सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला नव्हता. पदाधिकारी आणि कार्यकर्तेही याबाबत साशंक होते.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या. भारतीय जनता पक्षाशी त्यांची युती अपेक्षित आहे. भुजबळ फार्म हे त्याचे राजकीय केंद्र आहे. बुधवारी पार पडलेल्या या मुलाखतींना इच्छुकांची गर्दी ओसंडून वाहत होती.

Ajit-Pawar
Manikrao Kokate politics: छगन भुजबळ यांना टार्गेट करता करता माणिकराव कोकाटे स्वतःच झाले हिट विकेट!

माजी खासदार समीर भुजबळ हे मुंबईचे अध्यक्ष होते. त्यानंतर त्यांना विधानसभेत बंडखोरी केल्याने बाजूला करण्यात आले होते. मात्र आता ते पुन्हा सक्रिय झाले आहे. नाशिक महापालिका निवडणुकीची सर्व सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली आहेत.

Ajit-Pawar
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन '100+' वर ठाम, शिंदे शिवसेना पक्षाच्या अफाट अपेक्षा ठरताहेत महायुतीला अडसर?

भुजबळ फार्म येथे भुजबळ समर्थक नेत्यांनीच मुलाखती घेतल्या. यावेळी सुमारे दोनशे इच्छुकांनी मुलाखती दिल्या. मुलाखतीला येताना या इच्छुकांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे निवडणुकीत काय परफॉर्मन्स असेल याचा अंदाज नसतानाही झालेली गर्दी चर्चेचा विषय आहे.

राज्यातील महायुती सरकारचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला युती होईल हा मोठा आधार आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष जागा वाटपात ताणून धरणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मात्र भाजपच्या कलानुसार नमते घेणार असल्याचे संकेत आहेत.

महायुती विरोधात महाविकास आघाडी विस्कळीत झाली आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकीसाठी महायुती होणार याचे संकेत आहेत. महायुती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे. महायुतीचा हा इफेक्ट सध्या अजित पवारांना नाशिक शहरात उत्साह वाढवणारा ठरला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.