Nashik BJP : नाशिककरांच्या नेतृत्वावर भाजप पक्षश्रेष्ठींना भरोसा नाय का..? आता तर साधे संघटनात्मक विस्तारातही स्थान नाही

BJP leadership controversy : भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी ७४ जिल्हा प्रभारी नियुक्त केले आहेत. मात्र नाशिक जिल्ह्यातील एकाही आमदाराला यात स्थान देण्यात आलेलं नाही.

BJP, Devendra Fadnavis
BJP, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik BJP Politics : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा प्रभारींची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने महाराष्ट्रात ७४ जिल्हा प्रभारी नियुक्त केले आहेत. नाशिक शहराचा विचार करता भाजपने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना प्रभारी केलं आहे. रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्याकडे नाशिक उत्तर तर माजी खासदार सुजय विखे यांच्याकडे नाशिक दक्षिणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मालेगावच्या प्रभारीपदी अल्पसंख्याक सेलचे प्रमुख इंद्रिस मुलतानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपने जळगाव व अहिल्यानगर येथील नेत्यांवर नाशिकची जबाबदारी सोपवली असताना नाशिक जिल्ह्यातील पाचही आमदारांना संघटनात्मक विस्तारात स्थान देण्यात आलेलं नाही. ७४ जिल्हा प्रभारींमध्ये नाशिकच्या एकाही लोकप्रतिनिधीचे नाव नाही. यावर आश्चर्य व्यक्त केले जात असून भाजप पक्षश्रेष्ठींना नाशिकच्या नेतृत्वावर भरोसा नाही का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

नाशिककरांनी आजवर भाजपला भरभरुन दिलं. २०१४ पासून जर बघितलं तर सलग तीन वेळा शहरातील तीन्ही भाजप आमदारांना नाशिककरांनी निवडून दिलं. चांदवड व बागलाण तालुक्यातही भाजपचेच आमदार निवडून दिले. नुकत्याच झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला एक हाती सत्ता दिली. याशिवाय नगरपरिषद निवडणुकीतही तीन ठिकाणी भाजपला कौल दिला. मात्र, याउलट भाजपने नेहमी नाशिककरांच्या नेतृत्वावर अन्याय केल्याची भावना आता निर्माण होऊ लागली आहे.


BJP, Devendra Fadnavis
Nashik BJP : गिरीश महाजनांचा कारभार, तंट्याला नाही तोटा, नाशिक भाजपमध्ये 6 महिन्यात 6 वेळा राडा

नाशिक शहरातील तीन्ही आमदार भाजपचे आहे, यातील एका तरी आमदाराला मंत्रिपद दिलं जाईल अशी आशा मागच्या दहा वर्षांपासून नाशिककरांना लागून आहे. मात्र भाजपने तिथेही नाशिकरांची निराशा केली. चांदवड वासियांनाही तर स्वत:मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाचा शब्द दिला होता तोही अद्याप पूर्ण केलेला नाही. जिल्ह्यात पाच आमदार पण एकालाही महत्वाची जबाबदारी नाही.


BJP, Devendra Fadnavis
Nashik BJP : नाशिकमध्ये भाजपने मोठ्या भावाची भूमिका निभावली, बहुमत असूनही केला मोठा त्याग

येथेही जळगावच

नाशिकच्या कुंभमेळा नियोजनातही सत्ताधारी पक्षाचे असूनही त्यांना कधी विचारात घेतलं गेलं नाही. आता पक्षाच्या संघटनात्मक विस्तारात देखील त्यांना स्थान नाही. त्यामुळे, जाणीवपूर्वक नाशिकमधील नेतृत्व विकसीत होऊ दिलं जात नाही का,असा प्रश्न उपस्थित होत आहे. संधी दिली तरच नेतृत्व घडणार आहे. त्यामुळे साहजिकच नाशिककरांच्या नेतृत्वावर भाजपला भरोसा नाही का ? असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

नाशिकचे कुंभमेळा मंत्री जळगावचे, निवडणूक प्रभारीही जळगावचेच, नाशिकच्या लोकप्रतिनिधीची प्रभारी होण्याएवढीही क्षमता नाही का, असा प्रश्न यामुळे भाजपमधूनच विचारला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com